Daund News : डाळिंब येथील विठ्ठल बनात म्हस्के आणि भोंडवे परिवाराचा ऐतिहासिक निर्णय
[ साखरपुड्यातच लग्न लावण्याचा निर्णयांचे सर्व स्तरातून स्वागत ]
दौंड, ता. ९ सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम सुरू आहे. आजच्या काळात लग्नसमारंभ मोठ्या थाटात करण्याची पद्धत रूढ झाली आहे. लग्नसमारंभावर लाखो रुपये खर्च केले जातात. पण डाळिंब ( ता. दौंड ) येथील म्हस्के आणि वाढेबोल्हाचे भोंडवे परिवारातील सदस्य यांनी बडेजावपणा व अनावश्यक खर्चाला फाटा देत साखरपुड्यातच लग्न लावून समाजासमोर दोन्ही कुटुंबांनी श्रम व पैशाची बचत करून समस्त म्हस्के व भोंडवे परिवारातील सदस्यांनी एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
डाळिंब गावचे म्हस्के कुटुंबातील वधू राणी आणि वाढेबोल्हाचे भोंडवे कुटुंबातील वर राज्या दोघांनीही एकमेकांना पसंत केले. दोन्ही परिवाराचीही पसंती झाली आणि ५ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता साखरपुड्याचे खास आमंत्रण पै पाहूणे मिञमंडळी नातेवाईक परिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिला होता. सदर परिस्थितीचे वातावरण पाहता डाळिंब गावचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सर्जेराव म्हस्के हे वधूचे चुलते आणि त्यांचे बंधू व वधूचे वडील शिवाजी म्हस्के, श्रीकृष्ण म्हस्के, संतोष म्हस्के यांनी वर पक्षाचे मामा सुरेश म्हस्के व अशोक म्हस्के यांनी पुढाकार घेऊन साखरपुड्यातच लग्नाचा कार्यक्रम उरकून घ्यावा अशा निर्णय दोन्ही परिवारातील सदस्यांनी उपस्थित केला. त्यातूनच अवाजवी खर्च आणि वेळ वाया घालविण्यापेक्षा लागलीच लग्न लावून देण्यास काय हरकत आहे? असा प्रस्ताव समोर आला. दोन्ही परिवारातील सदस्यांनी पै पाहूणे मिञमंडळी नातेवाईक यांनी होकार दिला आणि अवघ्या दोन तासांतच कौंटुबिक वातावरणात मोजक्या समाजबांधवांच्या व आप्तेष्टांच्या उपस्थित ऐश्वर्या व सनी विवाहबद्ध झाले.
म्हस्के आणि भोंडवे कुटुंबातील सदस्यांनी घेतलेल्या निर्णयाचे आलेल्या सर्व नातेवाईकांनी या निर्णयांचे स्वागत व आनंद व्यक्त केला. अनाठायी लग्नाच्या खर्च करण्यापेक्षा एक चांगला आदर्श म्हस्के आणि भोंडवे या कुटुंबातील सदस्यांनी समाजापुढे ठेवला आहे. अनाठायी लग्नाच्या खर्चात आईवडील कर्जबाजारी होतात, गोरगरिबांना अलीकडच्या काळात खर्च परवडत नाही. विनाकारण पैसा खर्च करु नये योग्य वेळी योग्य ठिकाणी पैशांच्या वापर करावा अशा चांगला आदर्श प्रतिपंढरी समजल्या जाणाऱ्या डाळिंब गाव येथील विठ्ठल बनात मंदिराच्या ठिकाणी एक ऐतिहासिक निर्णय दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी आणि मध्यस्थी मान्यवरांनी दिलेल्या सूचनांचा आदर करुन ठरलेल्या साखरपुड्यातच लग्न लावण्याचा निर्णयांचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. पंचक्रोशीतील गावांमधून या लग्नाची जोरदार चर्चा असून यापुढे असेच विवाह झाले पाहिजेत. अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
आमच्या डाळिंब गावातील ही पहिलीच घटना आहे. यापुढे समाजाच्या सर्व घटकांनी हा आदर्श डोळ्यापुढे ठेवून सर्वांनी असेच निर्णय घ्यावा ही समाजासाठी काळाची गरज आहे.
—- सर्जेराव म्हस्के माजी उपसरपंच डाळिंब गाव