मुंबई
Trending

Daund News : पोरींनो, तुमच्यासाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाची मान ताठ ठेवा ; प्रा. वसंत हंकारे

दौंड, ( हरिभाऊ बळी ) ता. १४ कोणताही बाप आपल्या मुला मुलींना दर्जेदार शिक्षण मिळावे, अंगावर चांगले कपडे असावेत, त्यांची चप्पल सुद्धा फाटकी तुटके असू नये याची काळजी घेतो. स्वतः हलाखीचे जीवन जगत पाल्यांसाठी आयुष्यभर खस्ता खाणाऱ्या बापाला आपल्यामुळे कुठेही खाली बघायची वेळ येणार नाही याची खबरदारी मुलींनी आणि मुलांनी घेतली पाहिजे असे परखड मत सुप्रसिद्ध युवा व्याख्याते व प्रेरणादायी वक्ते प्रा. वसंत हंकारे यांनी आदर्श विद्यालय कानगाव ( ता. दौंड ) येथे आयोजित एका ह्रदयस्पर्शी व प्रेरणादायी कार्यक्रमात ते बोलत होते.


दौंड तालुक्यातील कानगाव येथे आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात बाप समजावून घेताना, या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती डॉ. विजयकुमार दिवेकर, योगिनी दिवेकर, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) युवक अध्यक्ष भाऊसाहेब फडके, संजय दिवेकर सर्व शिक्षक स्टाफ व शालेय व्यवस्थापन समिती यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात इतर शाळा महाविद्यालये सहभागी झाले होते.
पुढे बोलताना हंकारे म्हणाले की, तुम्ही कोण आहात? माझा बाप कोण आहे? माझा बाप माझ्यासाठी काय करतो? याचा विचार प्रत्येक मुलीने अंतर्मुख होऊन केला पाहिजे. एकदा तरी बाप झोपल्यावर राञीच्या दोन वाजता उठून त्याच्याकडे बघा. त्याच्या पॅन्ट व बनियनला चार जागेवर ठिगळं दिसतील. माञ तोच बाप तुम्हाला फॅन्सी व नवनवीन कपडे घालून शाळेत व काॅलेजला पाठवतो. २१ व्या शतकामध्ये मोबाईल मुळे पूर्ण पिढी बिघडत चालली असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मुलींसोबतच मुलांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी हंकारे यांनी गौतम बुद्ध, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भगतसिंग, फुले – शाहू आंबेडकर, सावित्रीआई फुले, ताराराणी, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचा अंगावर शहारे आणणारा आणि क्रांतीची मशाल पेटवणारा इतिहास सादर केला.
साविञीच्या लेकींनो स्वतः च्या मनाला विचारा, स्वतः उपाशीपोटी, उघड – नागडं वावरत रक्ताचं पाणी करुन तुम्हाला शिकवणारा तुमचा बाप समजून घ्याल का ? खरंच तुम्हाला बाप समजला का? अशी काळजाला भिडणारी आर्त साद त्यांनी मुला मुलींना घातली. शेवटी बोलताना हंकारे यांनी सांगितले की, शाळेत चार मार्क कमी पडले तरी चालतील पण वाघासारख्या बापाला आयुष्यात कधीही मान खाली घालायला लावू नका. बाप समजावून घेताना या विषयावर बोलत असताना अनेक उदाहरणे काळजाला भिडणारे शब्द व प्रखर विचार आपल्या परिवर्तनवादी शब्दातून हंकारे यांनी मांडले. यावेळी उपस्थित विद्यार्थिनी बहुसंख्येने आलेला पालकवर्ग, महिला अक्षरशः ढसाढसा रडत होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0