दौंड तालुका प्रतिनिधी, ता. ३ पुणे जिल्ह्यामध्ये सदाभाऊ खोत यांच्या खांद्याला खांदा लावून गेली पंधरा वीस वर्षे धडाडीने काम करणारे दौंड तालुक्यातील भानुदास शिंदे यांची रयत क्रांती Rayat Kranti संघटनेच्या राज्य प्रवक्ते व सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे पुणे जिल्ह्यासह दौंड तालुक्यात रयत क्रांती संघटनेमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऊस आंदोलन, दूध आंदोलन अशा कित्येक आंदोलनामध्ये भानुदास शिंदे यांनी सहभाग नोंदवून विस्थापित लोकांचा आवाज आपल्या धडाकेबाज भाषण शैलीतून बुलंद केला. त्यांच्यावर अनेक केसेस कोर्टात दाखल आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेपूर्वी त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश केला होता. परंतु नुकताच अवघ्या सहा महिन्यात भानुदास शिंदे यांनी पुन्हा रयत क्रांती संघटनेमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे यांनी पुन्हा संघटनेमध्ये प्रवेश केल्यामुळे संघटनेमधील कार्यकर्ते खुश असून संपूर्ण राज्यभरातून त्यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. या सर्वांची दखल घेत रयत क्रांती संघटनेने त्यांना राज्य प्रवक्ते व सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांचा एक प्रकारे सन्मान केलेला आहे.
गेली अनेक वर्षापासून भानुदास शिंदे हे माझ्यासोबत काम करत आहेत. तालुकाध्यक्ष पदापासून ते जिल्हा उपाध्यक्ष पदापर्यंत त्यांनी काम केलेले आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत मी त्यांच्यावरती राज्य प्रवक्ते व सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. त्यांना पुढिल वाटचालीत मन:पूर्वक शुभेच्छा
— सदाभाऊ खोत, आमदार तथा संस्थापक अध्यक्ष रयत क्रांती संघटना
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…