Daund News : मुसळधार पाऊसाने बाजरी पिक भुहिसपाट ; पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी
[ आपत्ती इत्यादी प्रसंगी व इतर कामे करण्यासाठी तलाठी हा अतिशय महत्वाचा दुवा आहे. परंतु तलाठी सध्याच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याबाबत जनतेकडून निराशा ]
दौंड, ता. २१ दोन दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात Daund Rain आलेल्या मुसळधार पावसामुळे डाळिंब या भागातील गाव परिसरात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बाजरी पिकांना महिन्याततच काढणीच्या मार्गावर असून हाताशी आलेला घास गेला आहे. डाळिंब येथील शेतकऱ्यांचे बाजरी पिक या पावसात झोपलेल्या स्थितीत गेल्याने खूप नुकसान झाले आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांची हातावर पोट अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. Daund Latest News
यावर्षी सुरुवातीलाच पावसाने वेळीच हजेरी लावल्याने बहुतेक शेतकऱ्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याची कमाई आपल्या शेतावर लावली होती. मागील तीन महिन्यांपासून आपल्या शेतावर राबराब राबून त्यांनी जीवाचे रान करीत पीक जगविले. नंतर पावसाची साथ मिळाली व व्यवस्थितपणे उत्पन्न मिळवून आपण आपल्या परिवाराचे उदरनिर्वाह करु असे स्वप्न शेतकरी उराशी बाळगून होता. अशातच दोन दिवसांपूर्वी तालुक्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते झाले. डाळिंब येथील बहुतेक शेतकऱ्यांचे या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. कारण उभे पिक हे वाऱ्यामुळे आडवे झालेल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, उत्पन्नात घट होण्याची शक्यता बळावली आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. Daund Latest News
बाजरी काढणीच्या मार्गावर असून हाताशी आलेला घास गेला आहे. बाजरी सह तरकारी अशा बहरलेल्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. प्रशासनाने भरपाई द्यावी.
—- शिवाजी म्हस्के, शेतकरी
जाहीर केलेल्या दुष्काळ यादीत दौंड तालुक्याचा समावेश आहे. केवायसी करुन सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांना तारणहार ठरणारे बाजरी पिक पूर्णतः वाया गेले आहे. दरम्यान नुकसान झालेल्या पिकांचे महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करावेत.
— सर्जेराव म्हस्के, उपसरपंच डाळिंब
झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत तातडीने पूर्ण करण्यात येतील. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर बोलणं झालं आहे.
— अभिमन्यू जाधव, गाव कामगार तलाठी डाळिंब