Daund News : बारामती मतदार संघाच्या निकालावर सर्वांची नजर ! मंगळवारी होणार खुलं जा. सीम सीम…!
एक्झिट पोल मध्ये आघाडी… माञ मतमोजणीनंतर समजणार सुळे की पवार ?
दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी
दौंड, ता. एक्झिटपोलमध्ये सुप्रिया सुळे यांना आघाडी दाखवण्यात आली माञ उद्या मतमोजणीनंतर येथील चित्र स्पष्ट होणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात एकुण ३८ उमेदवार रिंगणात आहेत. इतर उमेदवार किती मते खातात ? यावर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे गणित अवलंबून असणार आहे. मोठ्या फरकाने कोणत्याही उमेदवार विजयी होणार नाही असा ही कयास लावला जात आहे. माञ घोडा मैदान समोर आहे, निकालाला अवघे काही तास बाकी आहेत. उद्या दुपारपर्यंत खुलं जा सीम सीम होऊन सुळे की पवार हे दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे ! माञ तोपर्यंत
चर्चा झटतच राहणार आहे.
बारामती लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही अंतिम टप्प्यापर्यंत काळजाचा ठोका वाढवणारी ठरली आहे. आता तर निकालाची उत्सुकता चांगलीच शिगेला पोहोचलेली दिसून येत आहे. उद्या मंगळवार ४ जून कधी उजाडेल याची वाट उमेदवारासह मतदार व कार्यकर्ते मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. बारामती लोकसभा रणधुमाळीच्या रिंगणात तब्बल ३८ उमेदवार उभे होते. त्यापैकी महाविकास आघाडीच्या उमेदवार तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घेऊन सुप्रिया सुळे उभे आहेत.
तर महायुतीच्या सुनेत्रा पवार ह्या घड्याळ चिन्ह घेऊन लढत आहेत. तर तब्बल ३८ उमेदवारांनी या रिंगणात उडी घेत मतदानाला सामोरे गेले. विक्रमी मताधिक्याने कोणीच येणार नसले तरी कोणाच्या मतदान आकडेवारीत वाढ होते ते उद्या पहान औत्सुक्याचे ठरणार आहे.