[ नाथाचीवाडी, लडकतवाडी ते दुधाने चौक रस्त्यांची कामे अर्धवट ]
दौंड प्रतिनिधी यवत, ता. २९ नाथाचीवाडी, लडकतवाडी ते दुधाने चौक विविध भागात रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे विविध भागात रस्ते केले जात आहेत. मात्र याच रस्त्यांच्या अर्धवट कामामुळे नागरिकांना मनस्ताप होत आहे. अनेक ठिकाणी सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडल्याने विकास रखडल्याची चर्चा होत आहे.
नाथाचीवाडी, लडकतवाडी ते दुधाने चौक पिंपळगाव, कापरेवस्ती भागात कोट्यवधींचे रस्ते मंजूर झाले, माञ ही कामेच नागरिकांसाठी वैताग आणणारी ठरत आहेत. नाथाचीवाडी ते लडकतवाडी ते दुधाने चौक, पिंपळगाव भागातील मुख्य रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी जुने चांगल्या स्थितीत असणारे रस्ते खोदून ठेवले आहेत. मात्र अनेक दिवस झाले तरी रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या कामाचा दर्जा खालावल्याची नागरिकांची ओरड आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रमुख रस्ते अपूर्णावस्थेत आहेत. मात्र, ही कामे का रखडली याच उत्तर कुणी देत नाहीये. काही ठिकाणी काम सुरू असले तरी त्याला म्हणावी तशी गती नाही. त्यामुळे कामे सुरू झाल्यानंतरही नागरिकांची कसरत संपलेली नाही. कुठे पाइपलाइनचे काम, कुठे रस्त्याचे काम, कुठे पाणीपुरवठ्याचे काम आदी कामे लवकर होत नाहीत. त्यामुळे हे अडथळे अनेक दिवस तसेच असतात. रस्त्यांवर पडलेल्या अस्तव्यस्त खडीच्या रस्त्यातून वाहन चालवत जीवाशी कसरत करावी लागते. सोबतच अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो.
कामे कधी पूर्ण होणार ? …
रस्त्याची कामे सुरू असली तरी ती कधी पूर्ण होतील, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. संथगतीने कामे होणार असतील तर आणखी पावसाळा येईल, असे म्हणण्यापर्यंत वाईट चित्र आहे. संबंधित यंञणांना नागरिकांच्या समस्यांशी काहीही देणे घेणे नाही, असेच पाहायला मिळत आहे. प्रत्यक्षात काम करणाऱ्या संबंधित यंञणाच ढिम्म स्टाइलने काम करत आहेत. लोकप्रतिनिधींनाही त्या जुमानत नाहीत असेच यातून दिसते. रस्त्यांची अर्धवट कामे लवकर पूर्ण करावी अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच परिसरातील विरोधक देखील सुस्त पडल्याची चर्चा आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…