Daund Lok Sabha Election : दौंड मतदार संघातील अपक्ष उमेदवार शुभांगी धायगुडे यांना वाढता पाठिंबा
[ दौंडची जनता या निवडणुकीत बदल घडविणार ]
दौंड, ता. ११ गोरगरीब व सामान्यांच्या प्रश्नांची जाण असणाऱ्या आणि ओबीसी आरक्षण बचाव चळवळीत सक्रिय असलेल्या शुभांगी धायगुडे Candidate Shubhangi Dhaygude यांची मतदारांमध्ये क्रेझ असून किटली ह्या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत. ओबीसींच्या एकजुटीची वज्रमूठ झाल्यास त्यांच्यावर निश्चितच विजयाचा गुलाल उधळला जाणार आहे. त्यामुळे प्रस्थापित राजकारणी व विरोधकांची झोप उडाली आहे. या निवडणुकीत दौंडची जनता निश्चितच बदल घडविणार असून शुभांगी धायगुडे ह्या नवा इतिहास रचणार आहेत, असा आत्मविश्वास दौंड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांसह मतदारांमध्ये व्यक्त केला जात आहे.
शुभांगी धायगुडे ह्या उच्च विद्याविभूषित असल्यामुळे त्यांना गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची चांगली जाण आहे. सामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू समजून काम करण्याची त्यांची पद्धत आहे. शुभांगी धायगुडे यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अत्यंत नम्रता, निगवींपणा, दुसऱ्यांप्रती आदर आणि कुठलाही बोजवपणा नसल्यामुळे त्यांची सर्व सामान्य जनतेत जबरदस्त क्रेझ आहे. विशेष म्हणजे दौंड विधानसभा मतदार संघ स्थापन झाल्यापासून प्रस्थापित राजकारणी सोडून कोणत्याही महिला उमेदवाराला विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी आतापर्यंत मिळाली नसून ती संधी शुभांगी धायगुडे यांच्या रूपाने मिळणार आहे. दौंड विधानसभा मतदारसंघातून त्या अपक्ष उमेदवार म्हणून निश्चितच आमदार होतील आणि एक नवा इतिहास रचतील, असा ठाम विश्वास दौंड मतदारसंघात कार्यकर्त्यांसह मतदार व्यक्त करीत आहेत.
मजबूत प्रचार यंत्रणा व बुथ यंञणेमुळे माझा विजयाचा मार्ग सुकर – दौंड विधानसभा मतदारसंघात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देणाऱ्या शुभांगी धायगुडे यांच्या संपर्क दौऱ्याच्या अनेक फेऱ्या पूर्ण झाल्या असून या दौऱ्यात मतदारांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मतदारांच्या संपर्क दौऱ्याबरोबरच त्यांनी गावनिहाय बूथयंञणा अधिक वेगवान आणि तितकीच सक्षम केली असून प्रचार यंत्रणाही अत्यंत मजबूत केली आहे. ज्यामुळे आपल्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे शुभांगी धायगुडे यांनी दैनिक समर्थ भारत वृत्तसेवा प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.