Daund Fraud News : केडगाव येथे एकाची २२ लाख रुपयांची फसवणूक ; यवत पोलिसांत गुन्हा दाखल
दौंड, ता. यवत पोलीस स्टेशन Yawat Police Station हद्दीतील केडगाव येथील फिर्यादी रोहित चंद्रकांत गजरमल यांच्या फिर्यादीवरून केडगाव ता. दौंड येथील जमिन गट नंबर ९३ पैकी ७५ गुंठे क्षेञ साठेखत करुन देतो असे सांगून मनोहर हिरामण कांबळे याने २२ लाख रुपये आरटीजीएस मार्फत घेऊन, व्यवहार करण्यास टाळाटाळ करत विश्वासघात आणि फसवणूक केल्याप्रकरणी Daund Fraud News यवत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune Latest Crime News
५ सप्टेंबर २०२४ रोजी यवत पोलीस स्टेशन गुन्हा नंबर ८८४/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१६ ( २ ) ३१८ (४ ) प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. गजरमल प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आरोपी मनोहर कांबळे विरोधात कारवाई करण्यासाठी यवत पोलीस प्रशासनाने दक्षता घ्यावी. सदर प्रकरणात आरोपी कांबळे हा राजकीय दबावतंत्राचा वापर करत आहे. संबंधित तपास अधिकारी तसेच पोलिस अधिकारी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन फसवणूक करणारा आरोपी यांच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रोहित गजरमल यांनी दौंड विभागाचे पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब घोलप आणि यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांना केली आहे. Pune Latest Crime News