Daund Crime News : प्रति पंढरपूर म्हणून ओळख असणाऱ्या डाळींब बन येथील विठ्ठल मंदिरात चोरी
[ चांदीच्या मकरीची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड ]
दौंड, ता. ९ पुणे जिल्हा पंचक्रोशीतील प्रति पंढरपूर म्हणून प्रचिती असणाऱ्या डाळींब बन ता. दौंड येथील विठ्ठल मंदिरात अज्ञात व्यक्तीने शनिवारी रात्री ७ डिसेंबर ते रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास चोरीची घटना घडली असल्याचे उघडकीस आले. याबाबत डाळींब बन गावचे सरपंच बजरंग म्हस्के यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. Daund Crime News डाळींब बन गावचे सरपंच बजरंग म्हस्के यांच्या फिर्यादीवरून मंदिराच्या मुख्य द्वाराचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश केला.
त्यानंतर गाभाऱ्याचे कुलूप तोडून गाभाऱ्यात मूर्ती मागील मकर याची तोडफोड करून मंदिरात असलेली दानपेटी पळवून नेली आहे. रविवारी सकाळी मंदिरामधील सीसीटीव्ही फुटेज मिळवून यवत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असल्याची माहिती सरपंच बजरंग म्हस्के यांनी दिली. घडलेल्या घटनेमुळे परिसरात ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या भावना दुखावल्या आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई शिवाय असे प्रकार भविष्यात घडू नयेत यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी ग्रामपंचायत डाळींब बन यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी डाळींब बन ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल झरांडे उपस्थित होते.