Daund Crime News : प्लास्टिकच्या पिशवीत मिळते ताडी, दारु झाडाखाली बसते मैफल ; पोलिसांचे दुर्लक्ष
Daund Illegal Selling Of Alcohol : वेताळ मंदिर परिसरात प्लास्टिकचा खच मंदिर परिसर बनला दारुड्यांचा अड्डा
दौंड, ता. ४ नाथाचीवाडी ( ता. दौंड ) या गावची शोभा म्हणजे माटोबा तलाव आणि त्या तलावाच्या काठावर बसलेले भव्य असे
माटोबा मंदिर अर्थातच काळभैरवनाथ मंदिर १४० वर्षाची परंपरा असलेल्या या मंदिरात परिसरातील भाविकही येत असतात. माटोबा तळ्याचा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत आहे. माञ हुल्लडबाजांमुळे हा परिसर बदनाम होत आहे. तलावाच्या बाजूला वेताळ मंदिर असून परिसर बऱ्यापैकी झाडेझुडपे आहेत. त्यामुळे हा परिसर मद्यपींचा अड्डाच बनत आहे. त्यामुळे राजरोसपणे वावरही वाढत चालला आहे. पोलिसांनी माटोबा मंदिर पवित्र अशा ठिकाणी मद्यप्राशन केले जाणार नाही याची दक्षता घेऊन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. माञ, अद्यापही याकडे पोलिसांचे दुर्लक्षच आहे. झाडाझुडपात सर्रास मद्य व गांजाची विक्री होत असून त्याचे व्यसनही येथेच झाडाखाली वा एखाद्या आडोशाला शोधून होत असल्याचे धक्कादायक चित्र पुढे आले आहे. Daund Crime News
पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे माटोबा तलाव परिसरात दारुड्यांचा मुक्त संचार सुरू आहे. वेताळ मंदिर परिसरात मद्यपी बेधुंदपणे या भागात दिसतात. पहाटेपासूनच या भागात ताडी आणि दारू खरेदी करण्यासाठी गर्दी होते. या भागात ताडी आणि दारू प्लास्टिकच्या पिशवीत मिळते. मद्यपी ती खरेदी करून आडोसा गाठतात किंवा मग आपल्याच कारमध्ये पिऊन धिंगाणा करतात. पोलिसांकडून तात्पुरती कारवाई होते. दोन दिवसाचा देखावा झाला की परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे या भागात कायमस्वरूपी बंदोबस्त व्हावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. तेथे दररोजच जेवणावळ्या सुरू आहेत. मद्यप्राशन करूनही सर्व साहित्य तलावाच्या भोवती फेकून दिले जाते. त्यामुळे तलावाच्या भोवती प्लास्टिक पिशव्या व बाटल्यांचा खच पडला आहे. काहीजण यथेच्छ दारु ढोसून परत निघताना बाटल्या तशाच सोडून न जाता फोडत आहेत, त्याचा ञास इतरांना होऊ शकतो याचे भानही या मद्यपींना नाही. अशा घटनांमुळे एखाद्याच्या जीवाला धोका पोहोचू शकतो त्यामुळे पोलिसांनी माटोबा मंदिर व तलाव परिसरातील वातावरण दूषित करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. Daund Crime News
गावात अवैध धंद्यांमुळे शांतता भंग होऊन तरुण पिढी व्यसनाधीन होऊन गुन्हेगारीकडे आकर्षीत होत आहे. त्यानेच अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त होत आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना चकवा देत हप्ते घेणारे पोलिस कर्मचारी कोण ? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. याची दक्षता घेऊन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. Daund Crime News