Daund Crime News : निवडणुका संपताच चोरट्यांचा धुमाकूळ ! एकाच राञीत चार ठिकाणी चोऱ्या
[ पोलिसांची गस्ती कुचकामी ; ढिम्म पोलिस यंञणेला चोरट्यांचे आवाहन ]
( दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी )
Daund Crime News : दौंड, ता. ३० खामगाव ( गणेश नगर ) ता. दौंड येथे मंगळवारी ( २८ मे रोजी रात्री १० ते गुरुवारी २९ मे रोजी पहाटे अंदाजे तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक Lok Sabha Election संपताच चोरट्यांनी डोके वर काढले असल्याचे चित्र असून पोलिस हतबल, नागरिक जेरीस असे चित्र दिसत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नाकाबंदी करत कारवायांची मोहीम उघडली होती. अनेक सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले. परंतु निवडणूक संपताच चोऱ्या, घरफोडीच्या घटना पुन्हा सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे फक्त चार दिवसांपूर्वी यवत पोलिस Yawat Police Station हद्दीमध्ये चोरीची घटना घडली त्या गुन्ह्याची अजून उकल झालेली नाही. तोच खामगाव मध्ये चार ठिकाणी धाडसी चोरी झाली. अशा घटनांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे चोरट्यांचे धाडस वाढले आहे. ही बाब पोलिस गांभीर्याने घेणार की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. Daund Crime News
खामगाव मध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत सहा घरफोड्या केल्या. त्यापैकी चार ठिकाणी सोने चांदीच्या वस्तू, रोख रक्कम व मोटारसायकलही चोरट्यांनी लंपास केली आहे. सचिन सुरेश नागवडे, रामचंद्र जयसिंग नागवडे, प्रदिप बबन नागवडे, संतोष बाबुराव नागवडे यांच्या बंद घराचे कुलूप कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी २ लाख ७३ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच संकेत बाळासाहेब पंडित यांची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकल ( एम.एच.१४ बी. एस. ९३६० नंबरची मोटरसायकल लंपास केली आहे. याप्रकरणी सचिन सुरेश नागवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांवर यवत पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा Yawat Police Station दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. Daund Crime News
सध्या वातावरणात प्रचंड उकाडा असल्याने गावातील नागरिक घराला कुलूप न लावताच बाहेर अंगणात झोपतात. नागरिकांनी सतर्क राहावे,
ग्रामपंचायत हद्दीतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत करावेत. गावातील पोलीस पाटील व नागरिकांनी
गावच्या सुरक्षेसाठी गस्त वाढवावी. लवकरच गावोगावी पोलीस पाटील व नागरिकांची बैठक घेऊन राञीच्या वेळी पोलिस गस्त वाढवणार
—- पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यवत
चोरट्यांनी एकुण सहा ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला. परंतु दोन ठिकाणी त्यांच्या हाती काही लागले नाही. चोरट्यांनी चोरी करण्याअगोदर बाहेरील बाजूस असलेली लाईट बंद केली. ज्याठिकाणी बटणं नाही त्या ठिकाणचे बल्ब काढून चोरी केली.
— सचिन नागवडे, फिर्यादी