क्राईम न्यूज

Daund Breaking News : “भररस्त्यात भावा-आईच्या डोळ्यात तिखट फेकून तरुणीचे अपहरण!”; दौंडमध्ये थरार, पुणे-सोलापूर हायवे रोखला

Daund Latest Kidnapping News : लग्नाची खरेदी करून परतताना 21 वर्षीय तरुणीला पळवले; जहीर आणि अयान शेख या सख्ख्या भावांवर गुन्हा; परिसरात तणाव, पोलिसांची 6 पथके रवाना

दौंड, भिगवण | पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे भरदिवसा एका 21 वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पीडित तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून लग्नाची खरेदी करून घरी परतत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर भिगवण परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त ग्रामस्थांनी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरला होता. Daund Latest Crime News

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीचे येत्या 22 फेब्रुवारीला लग्न आहे. त्यानिमित्ताने ती आपल्या आई आणि भावासोबत खरेदीसाठी गेली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास स्वामी चिंचोली परिसरात आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच आरोपींनी आई आणि भावाच्या डोळ्यात लाल तिखट फेकले. डोळ्यांची प्रचंड आग होऊ लागल्याने त्यांना काहीही दिसेनासे झाले, याच संधीचा फायदा घेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने गाडीत ओढले आणि तिथून पळ काढला.

सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा; पोलिसांचा मोठा खुलासा

या प्रकरणात पोलिसांनी जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी हे एकमेकांचे शेजारी असून लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यात फोनवर बोलणे आणि मेसेजद्वारे संवाद होत असल्याचे प्राथमिक तपासात आणि कॉल डिटेल्समध्ये (CDR) निष्पन्न झाले आहे.

पोलिसांची कारवाई आणि रूट मॅप

6 पथके रवाना: मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तात्काळ 6 पथके विविध दिशांना रवाना केली आहेत.

165 किमीचा रूट मॅप: सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या पळून जाण्याचा 165 किलोमीटरचा रूट मॅप तयार केला आहे.

व्हॉट्सॲप तपास: आरोपींचे फोन सध्या बंद असून, त्यांचे व्हॉट्सॲप चॅट्स आणि इतर तांत्रिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भिगवण बंदची हाक आणि तणाव

या घटनेनंतर रात्री उशिरा मोठ्या संख्येने नागरिक भिगवण पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले होते. आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी ‘भिगवण बंद’ची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, घटनेचे गांभीर्य आणि दोन वेगवेगळ्या धर्मांचा अँगल लक्षात घेता, पोलिसांनी परिसरात कोणताही धार्मिक तणाव निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेतली आहे.

“नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आम्ही तपासासाठी पूर्ण ताकद लावली आहे. कोणीही कायदा हातात घेऊ नये किंवा मोर्चा काढू नये, अन्यथा कारवाई केली जाईल.” > — गणेश बिरादार, अपर पोलीस अधीक्षक

vivek

Recent Posts

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

14 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

14 hours ago

Supriya Sule : राज्यसभेचा ‘पेच’ सुटणार? शरद पवारांच्या उमेदवारीसाठी सुप्रिया सुळेंचे ‘दिल्ली मिशन’; तर ठाकरेंच्या शिवसेनेचाही जागेवर दावा

•पुढील दोन दिवस पवारांची प्रकृती तपासणी | सुप्रिया सुळे काँग्रेस श्रेष्ठींना भेटणार | 'आदित्य' हट्ट…

19 hours ago