Daund Breaking News : माटोबा तलावात सापडला कटला जातीचा २४ किलोचा मासा
[ दौंड प्रतिनिधी हरिभाऊ बळी ]
Daund Biggest Fish News : दौंड, ता. ९ दौंड तालुक्यातील नाथाचीवाडी येथील ब्रिटीश कालीन राणी व्हिक्टोरिया अर्थात माटोबा तलावात धनंजय खळदकर या मच्छीमाराला तब्बल २४ किलो वजनाचा कटला जातीचा मासा सापडला आहे. एवढ्या वजनाचा कटला जातीचा मासा जाळ्यात सापडल्याची माहिती परिसरातील नागरिकांना समजताच माशाला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. Daund Biggest Fish News
माटोबा तलावात ( Daund Matoba Pound ) एवढा मोठा मासा सापडण्याची( 24 kg fish ) ही पहिलीच वेळ आहे. हा मासा पुणे येथे विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचे खळदकर यांनी सांगितले. Daund Biggest Fish News
सध्या कडक उन्हाळा असल्याने तलावातील पाणी पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे. कटला जातीचा मासा हा गोड्या पाण्यात राहणारा असून वाहत्या पाण्यात प्रवाहाच्या दिशेनें प्रवास करत असतो. सध्या माटोबा तलावात चिलापी जातीचेच मासे सापडतात. कटला, रहु, वाम्ब, मरळ या जातीच्या माशांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे या माशांना सध्या भाव अधिक आहे. Daund Biggest Fish News