Mumbai Drugs News : अंमली पदार्थ विरोधी कक्षाची ‘डबल स्ट्राइक’: 7.01 कोटींचे ड्रग्ज जप्त नायजेरियनसह 9 तस्कर जेरबंद
Mumbai ANC Unit Busted Drug Racket : आंतर-राज्यीय टोळीचा पर्दाफाश; कुर्ला, बोरिवली, वाकोलासह 6 ठिकाणी धडक कारवाई
मुंबई :- मुंबई शहराला अंमली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. Mumbai Drug Racket अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या (ANC) विविध युनिट्सने शहरात एकूण 6 ठिकाणी धडक कारवाई करत तब्बल 7 कोटी 1 लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून, यात एका नायजेरियन नागरिकांसह एकूण 9 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. Mumbai Latest Crime News


वरिष्ठांच्या आदेशानुसार, अंमली पदार्थ विकणाऱ्या ड्रग्ज पेडलर्सविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान वाकोला आणि सांताक्रूझ पूर्व परिसरात केलेल्या महत्त्वपूर्ण कारवाईत पोलिसांनी एका नायजेरियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 523 ग्रॅम ‘कोकेन’ हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अंदाजित किंमत 5 कोटी 23 लाख रुपये आहे. Mumbai Police Latest Crime News
या व्यतिरिक्त, कुर्ला सी.एस.टी., माझगाव, घोडपदेव (भायखळा) आणि बोरिवली या परिसरांमध्ये केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 5 तस्करांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून 211 ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त करण्यात आले, ज्याची किंमत सुमारे 54.65 लाख हजार रुपये आहे. Mumbai Police Latest Drug News
नाइट्राझेपाम टॅब्लेटची आंतर-राज्यीय तस्करी उघड
अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या घाटकोपर युनिटने एका जुन्या गुन्ह्याच्या तपासातून आंतर-राज्यीय अंमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या तपासात उत्तर प्रदेश राज्यातून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीतील आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 24,900 ‘नाइट्राझेपाम’ (Nitrozepam) टॅब्लेट जप्त करण्यात आल्या, ज्यांची किंमत सुमारे 1 कोटी 24 लाख रुपये आहे. या गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण 28,360 टॅब्लेट हस्तगत करण्यात आल्या आहेत.
एकंदरीत, या विशेष मोहिमेत 523 ग्रॅम कोकेन, 211 ग्रॅम एम.डी. आणि 24,900 हून अधिक नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई पोलीस अंमली पदार्थ मुक्त समाज निर्मितीसाठी कसोशीने प्रयत्नशील असल्याचे या यशस्वी कामगिरीतून स्पष्ट होते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
सदरची यशस्वी कामगिरी देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त (गुन्हे), शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा) नवनाथ ढवळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ही कामगिरी फत्ते केली. यामध्ये कांदिवली, घाटकोपर, बांद्रा, आझाद मैदान आणि वरळी युनिटच्या प्रभारी अधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता.


