क्राईम न्यूज

Mumbai Crime News : डेटिंगच्या आड दगाफटका! महिला डॉक्टरचा लैंगिक छळ, गर्भपातासाठी जबरदस्ती

Mumbai Crime News : ‘हिंगे’ अ‍ॅपवरून ओळख, नातं प्रस्थापित झाल्यानंतर फसवणूक; शरीरसंबंधाचे फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

मुंबई | ऑनलाईन डेटिंग अ‍ॅपवर सुरू Online Dating App fraud झालेलं मैत्रीचं नातं एका महिला डॉक्टरसाठी अत्यंत त्रासदायक ठरलं आहे. 28 वर्षीय डॉक्टरला प्रेमाचे आमिष दाखवत तिच्यावर लैंगिक अत्याचार, गर्भपातासाठी जबरदस्ती आणि ब्लॅकमेलिंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात Mumbai MIDC Police Station Crime News गुन्हा दाखल करण्यात आला असून, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. Mumbai Latest Crime News

फिर्यादी डॉक्टर अंधेरीतील एका खाजगी रुग्णालयात कार्यरत असून मूळ कोकणातील आहे. ती शिक्षणानिमित्त मुंबईत राहत होती. 2023 साली ‘हिंगे’ या डेटिंग अ‍ॅपवर तिने नाव नोंदवले. तिथे तिची ओळख डोंगरीत राहणाऱ्या खालिद खानयारी (27 वय) या युवकाशी झाली. खालिदचा कुटुंबीय शॉल विक्रीचा व्यवसाय करतो.

ऑक्टोबर २०२३ मध्ये खालिदने तिच्या नवी मुंबईतील घरी भेट दिली आणि त्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण झाले. या काळात आरोपीने तिचे काही खासगी फोटो काढले. पुढे 27 फेब्रुवारी 2025 रोजी डॉक्टरला गर्भवती असल्याचे समजल्यावर खालिदने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिच्यावर दबाव आणला. त्यामुळे तिच्या प्रकृतीवर गंभीर परिणाम झाला.

यथावकाश खालिदने तिच्याशी संपर्क टाळायला सुरुवात केली. चौकशी केल्यानंतर डॉक्टरला समजले की 10 ऑक्टोबर 2024 रोजीच त्याचा साखरपुडा झाला होता. हे समजल्यावर जेव्हा डॉक्टरने उत्तर मागितले, तेव्हा आरोपीने स्पष्ट नकार दिला आणि ‘लग्नाचे कोणतेही आश्वासन दिले नव्हते’ असे सांगितले.

त्यानंतर खालिदने दोघांचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या मानसिक छळाला कंटाळून डॉक्टरने अखेर एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी खालिद खानयारीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 351(2) व 89 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

6 hours ago