क्राईम न्यूज

Dahisar Police News : दहिसर पोलिसांची ‘शतकी’ कामगिरी! – CEIR पोर्टलच्या मदतीने तीन महिन्यांत 102 हरवलेले मोबाईल फोन शोधून मूळ मालकांना केले परत

Dahisar Police Find Stolen Mobile : मुंबई, महाराष्ट्र आणि परराज्यांतून गहाळ मोबाईलचा यशस्वी शोध; मालकांना परत मिळताच आनंद व्यक्त

मुंबई :- मुंबईतील दहिसर पोलीस ठाण्याने Dahisar Police Station CEIR पोर्टल वापरून हरवलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्याच्या विशेष मोहिमेत अत्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. केवळ तीन महिन्यांच्या कालावधीत, 16 सप्टेंबर 2025 ते 15 डिसेंबर 2025 दरम्यान, पोलिसांनी तब्बल 102 गहाळ मोबाईल फोन ट्रेस करून हस्तगत केले आणि ते मूळ मालकांना परत केले. Mumbai Police Latest Crime News

मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी

दहिसर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार श्याम रणशेवरे आणि पोलीस हवालदार हेमंत विचारे यांनी या विशेष मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले मोबाईल फोन सध्या जे वापरत होते, त्यांच्याशी संपर्क साधला. या ट्रेसिंग ऑपरेशनमध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि इतर परराज्यांतून हे 102 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले.

पोलीस ठाण्याने 15 डिसेंबर 2025 रोजी एका विशेष कार्यक्रमात वरिष्ठांच्या हस्ते हे सर्व मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले. अनेक महिन्यांपूर्वी हरवलेला आपला महागडा फोन परत मिळाल्याने मूळ मालकांनी आनंद व्यक्त केला.

वरिष्ठांचे मार्गदर्शन

बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी, अपर पोलीस आयुक्त शशिकुमार मीना (उत्तर प्रादेशिक विभाग) आणि पोलीस उप आयुक्त महेश चिमटे (परिमंडळ-12) यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. तसेच, सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजी शिंदे (दहिसर विभाग) आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या देखरेखीखाली सहाय्यक पोलीस फौजदार श्याम रणशेवरे आणि पोलीस हवालदार हेमंत विचारे यांनी ही उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.

vivek

Recent Posts