ठाणेमुंबई
Trending

Dahisar Fire News : दहिसरमध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावर भीषण आग; संपूर्ण सोसायटीचा जीव टांगणीला

Dahisar Latest Fire News : आनंदनगर परिसरात ‘मेजर कॉल’! चार बंबांच्या मदतीने आगीवर नियंत्रण, जीवितहानी टळली

मुंबई :- मुंबईतील उंच इमारतींमध्ये वारंवार होणाऱ्या आगीच्या घटना पुन्हा एकदा धोक्याची घंटा देत आहेत. आज (बुधवार) दहिसर पूर्व येथील आनंदनगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावर मोठी आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की, संपूर्ण इमारतीमधील रहिवाशांचा जीव काही काळासाठी टांगणीला लागला होता. Dahisar Fire News

तात्काळ चार अग्निशमन गाड्या दाखल

आनंद नगरमध्ये सब्जी मार्केट समोर असलेल्या इमारतीत दुपारी ही आग लागल्याची माहिती मिळताच महापालिका प्रशासनाने कोणतीही वेळ न दवडता तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना केल्या. अग्निशमन दलाचे चार बंब दाखल झाले आणि जवानांनी युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले. Dahisar Anand nagar Fire News

जवळपास 15 ते 20 मिनिटांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या घटनेमुळे इमारतीमधील एक घर पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

वाहतूक कोंडी आणि तपासाचे आव्हान

या आगीच्या घटनेमुळे परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी आणि त्यानंतर पाण्याचे टँकर भरून आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना विशेष परिश्रम घ्यावे लागले.

आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.शॉर्टसर्किटमुळे आग लागली की अन्य कोणते कारण आहे, याबाबत दहिसर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अधिक तपास करत आहेत. मुंबईतील इमारतींमध्ये वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे मोठे आव्हान महापालिका प्रशासनासमोर उभे राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0