Dahi Handi Wishes 2024 In Marathi : दहीहंडी च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages
Dahi Handi Wishes 2024 In Marathi : श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून प्रत्येक वर्षी जन्माष्टमी साजरी केली जाते. जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा दहीहंडीचा उत्सव २७ ऑगस्टला होणार आहे.
दहीहंडी हा उत्सव श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षाच्या नवव्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालपणीच्या गोड आठवणींना उजाळा दिला जातो. या उत्सवात गोपाळकाला किंवा गोविंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकांची दहीहंडी फोडण्याची परंपरा आहे.
दहीहंडीच्या या पर्वावर आपल्या मित्रांना, कुटुंबीयांना आणि इतर परिचितांना शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp आणि Facebook वर सुंदर शुभेच्छा संदेश पाठवण्याची संधी आहे.
या सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या संदेशात श्रीकृष्णाच्या गुणांचा आणि दहीहंडीच्या उत्साहाचा उल्लेख करून, आपल्या प्रिय व्यक्तींना आनंद आणि समृद्धीच्या शुभेच्छा द्या.
Dahi Handi Wishes 2024 Message :
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
“हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा”
“तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!”
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!
“फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!”
जोशात साजरा करू गोकुळाष्टमीचा सण हे आला रे आला गोविंदा आला
“जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!”