
Mumbai BMC ON Kambutar Khana : मुंबईतील 51 कबुतरखान्यांवर टप्प्याटप्प्याने कारवाई होणार
मुंबई :- मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याच्या मोहिमेला शुक्रवारी सकाळपासूनच सुरुवात केली. राज्य सरकारच्या स्पष्ट निर्देशानंतर दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबुतरखान्यावर जी उत्तर विभागातर्फे कारवाई करण्यात आली. या कारवाईत अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले तसेच कबुतरांना दिले जाणारे खाद्य काढून टाकण्यात आले. Mumbai BMC ON Kambutar Khana
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे फुप्फुसाचे आजार, ॲलर्जी व श्वासाच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. काही प्रकरणांमध्ये मृत्यूही झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सरकारने याबाबत लक्ष घालून महापालिकेला कारवाईचे आदेश दिले. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिले, त्यानंतर लगेचच ही कारवाई सुरू झाली आहे.
दादरचा कबुतरखाना हा मुंबईतील एक पुरातन आणि ओळख निर्माण करणारा ठिकाण मानला जातो. मात्र, नागरिकांच्या वाढत्या आरोग्यविषयक तक्रारी, खासकरून ‘हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस’सारख्या आजारांमध्ये वाढ, यामुळे कबुतरखाने हटवावेत, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत होती.
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले की, “दादर कबुतरखान्याचा मूळ ढाचा पुरातन असून तो तसाच ठेवण्यात आला आहे, मात्र त्याभोवती उभारलेले अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटवण्यात आले आहे.”
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले की, “दादर कबुतरखान्याचा मूळ ढाचा पुरातन असून तो तसाच ठेवण्यात आला आहे, मात्र त्याभोवती उभारलेले अनधिकृत बांधकाम पूर्णपणे हटवण्यात आले आहे.”
मुंबई शहरात सध्या 51 कबुतरखाने आहेत. गोरेगाव आणि मालाड या भागांत प्रत्येकी पाच कबुतरखाने असून तिथेही लवकरच कारवाई होणार आहे. तर कुर्ला, चेंबूर, गोवंडी, मुलुंड, गिरगाव, मुंबादेवी, मशीद बंदर या भागांत एकही अधिकृत कबुतरखाना नाही.



