Cyber Scam : 1 लाख 75 हजारची ऑनलाईन फसवणूक
ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम रुपये 1 लाख 75 हजार परत करण्यात सायबर पोलीस ठाणेस यश
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील तुळींज पोलीस वाणे हद्दीत राहणारे संदेश तांदळे यांनी इंस्टाग्राम आलेल्या ऑनलाईन इन्वेस्टमेंट जाहिरातीवर क्लिक केले असता त्यांना टेलिग्राम ग्रुपवर जोडण्यात येवून त्यांची ऑनलाईन टास्क द्वारे त्यांची 1 लाख 75 हजारची फसवणुक झाल्याबाबत तक्रार त्यांनी www.cybercrime.gov.in 12 जुलै 2023 रोजी दिली होती. Cyber Scam
तक्रारीबाबत तात्काळ दखल घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. सदरचे सर्व व्यवहार वेगवेगळ्या बॅंकेचे खात्यावर गेल्याचे दिसून आले. तात्काळ तक्रारदार यांचे फसवणूक रक्कमेबाबत संबधीत बँक यांच्या सोबत तात्काल पत्रव्यवहार करुन सातत्यपूर्ण पाठपुरावा करून फसवणूण रक्कम थांबविण्यात यश आले. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी 4 थे न्यायालय वसई यांच्या आदेशाने सदरची फसवणूक रक्कम तक्रारदार यांचे मूळ खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Cyber Scam
पोलीस पथक
अविनाश अंबुरे Avinash Ambure, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, पोलीस हवालदार प्रविण आव्हाड, पोलीस अंमलदार गणेश इलग, महिला पोलीस अंमलदार पल्लवी निकम, पोलीस अंमलदार प्रशांत बोरकर, सोनाली मोरे, प्रविण सावंत यांनी पार पाडली आहे. Cyber Scam