Mira Road Latest Job Fraud News : लाओसला चांगल्या पगाराचे आमिष दाखवून पाठवले; ‘फेसबुक फ्रॉड’साठी प्रशिक्षण देण्याचा,चिनी कंपनीत तरुणांची पिळवणूक काशिमीरा गुन्हे शाखेची कारवाई
मिरारोड :- चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून भारतीय तरुणांना थायलंडमार्गे अवैधरीत्या लाओस (Laos) या देशात पाठवून त्यांची पिळवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर रॅकेटचा पर्दाफाश गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-1, Kashmira Crime Branch Unit 1 काशिमीरा यांनी केला आहे. ‘सायबर गुलामगिरी’साठी तरुणांना विदेशात पाठवणाऱ्या एका एजंटला नयानगर येथून अटक करण्यात आली आहे. Mira Road Latest Crime News
नेमके काय आहे प्रकरण?
मिरा-भाईंदरमधील काही एजंटनी मिळून इस्माईल इब्राहीम सय्यद या तरुणाला लाओस येथे ऑनलाईन कॉल सेंटरमध्ये चांगल्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. मात्र, लाओसमध्ये पोहोचल्यावर त्याचे आणि इतर तरुणांचे आयुष्य पूर्णपणे बदलले.
पीडित इस्माईल सय्यद यांच्या तक्रारीनुसार, नयानगर येथील समीर शेख, आमीर खान आणि सागर गौतम मोहीते ऊर्फ ॲलेक्स या आरोपींनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी इस्माईलसह शाबान अली आणि लकी अली (रा. गुजरात) यांना मुंबईतून लाओसला पाठवले.
‘सायबर फ्रॉड’चे प्रशिक्षण
लाओसमध्ये एका चिनी वंशाच्या ‘चायसन’ नावाच्या इसमाने त्यांची भरती करून घेतली. या तरुणांना भारतीय मुलींच्या नावाने फेसबुकवर बनावट खाती उघडून परदेशातील भारतीय लोकांशी मैत्री करण्यास सांगितले जात होते. त्यानंतर, त्यांना विश्वासात घेऊन गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक (सायबर फ्रॉड) करण्याचे प्रशिक्षण दिले जात होते.
पासपोर्ट फाडण्याची धमकी
पीडित तरुणांनी हे गैरकृत्य करण्यास नकार दिला असता, त्यांचे पासपोर्ट फाडण्याची तसेच मारून टाकण्याची भीती दाखवून त्यांना इमारतीच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला होता.
या तक्रारीनंतर नयानगर पोलीस ठाण्यात मानवी तस्करी, फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांशी संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेने यातील एजंट आमिर सोहेल नईम एहमद यास नयानगर येथून अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा येथील प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिलकुमार शिंदे यांच्या पथकाने ही कामगिरी यशस्वी केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…