Vasai Latest Cyber Crime awareness : Dattani Mall मध्ये झालेल्या कार्यक्रमात 60 नागरिकांना सायबर सुरक्षेचे धडे
वसई : “फसवणुकीपासून स्वतःला वाचवा, डिजिटल जगात सजग राहा” या मंत्रासोबत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने वसई पश्चिम येथील Opulent Banquets, Dattani Mall येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. Vasai Latest Cyber Crime awareness
21 जून 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता झालेल्या या कार्यक्रमात 16 ते 70 वयोगटातील 60 हून अधिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले. कार्यक्रमाचे नेतृत्व सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस Cyber Crime Branch उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी केले.
1.ट्रेंडिंग सायबर गुन्हे – फोन, ईमेल, QR कोड आणि OTP फसवणूक
2.सोशल मीडियावरील धोके – बनावट प्रोफाइल, मॉर्फिंग, ब्लॅकमेलिंग
3.गुन्ह्यांपासून वाचण्याच्या खबरदारीच्या उपाययोजना
4.गुन्हा घडल्यास तात्काळ तक्रार करण्याचे पर्याय – 1930 हेल्पलाईन, www.cybercrime.gov.in
या कार्यक्रमात उपस्थितांना सायबर सुरक्षा पत्रक देण्यात आले, तसेच दैनंदिन व्यवहारात डिजिटल सुरक्षितता कशी राखावी याविषयी उपयुक्त सूचना दिल्या गेल्या. नागरिकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला असून अनेकांनी “हा कार्यक्रम डोळे उघडणारा होता” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…
Pune Swargate Case : पुणे पोलिसांचा ऐतिहासिक तपास | अश्लील व्हिडिओची गुगल हिस्टरी आणि बसमधील…
Rohit Pawar On DGCA And Central Minster : व्हीएसआर कंपनीला वाचवण्यासाठी दिल्लीतून हालचाली? | 28…