Cyber Fraud : सायबर फसवणूक प्रकणात पोलिसांना मोठं यश, फसवणुकीतील 10.99 लाख रुपये दिले परत
Navghar police Arrested Cyber Fraud And Take Money Back : नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या व्यक्तीची आर्थिक फसवणूक, सीबीआयचा अधिकारी असल्याची बतावणी करून झाली फसवणूक
भाईंदर :- सायबर फसवणुकीतील Cyber Fraud गमावलेले दहा लाख 99 हजार 999 रुपये परत मिळवून देण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे. Bhayandar Cyber Crime Branch सीबीआय अधिकारी असल्याची बतावणी करून बेकायदेशीर पार्सल तुमच्या नावाने आले आहे. त्यामध्ये संशयित वस्तू आहे अशी बतावणी करून या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडायचे असेल पैशाची मागणी केली होती. तक्रारदार यांनी बँकेतून कर्ज काढून दहा लाख 99 हजार 999 रुपये संशयित बँक खाते मध्ये जमा केले होते. त्यानंतर आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात तक्रारदार यांनी एनसीसीआरपी पोर्टलवर तक्रार दाखल केली होती.
सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या नवघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या गुप्ता यांना अनोळखी व्यक्तीने कॉल करून सीबीआय अधिकारी बोलत असल्याचे भासून तुमच्या नावाने एक संशयित बेकायदेशीर पार्सल आले आहे. या संपूर्ण प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी पैशाची मागणी केली होती. गुप्ता यांनी बँकेतून कर्ज काढून दहा लाख 99 हजार 999 रुपये बँकेत जमा केले होते. या संपूर्ण प्रकरणाबाबत संशयालयाने गुप्ता यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ फसवणुकीतील रक्कम ज्या संशयित बँक खात्यात गेले होते ती संपूर्ण रक्कम थांबवली होती. पोलिसांनी न्यायालय आणि बँक यांच्याशी पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम मूळ खातेदाराला परत मिळवून देण्यास यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीकडून आभार व्यक्त करणे झाले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार विलास खाटीक, राहुल बन, महिला पोलीस अंमलदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे.