क्राईम न्यूजमुंबई
Trending

Cyber Crime News : समय रैनाच्या शोवर सायबर पोलिसांची कारवाई, इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व 18 भाग यूट्यूबवरून हटवले जाणार

Mumbai Cyber Police Take Action On Samay Raina India Got Latent Show : सायबर पोलिसांनी युट्युबर समय रैना यांच्यावर मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. रणवीर अलाहाबादियासोबतचा वादग्रस्त एपिसोड झाल्यापासून या शोविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी रणवीर आणि समयसह शोशी संबंधित 30 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

मुंबई :- यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांचा अडचणी काही संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत. अलीकडेच, रणवीर अलाहाबादियाने समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये भाग घेतला. या शोमध्ये त्याने आई-वडिलांची अशी खिल्ली उडवली होती, ज्यानंतर त्याला सतत विरोध होत आहे.आता याप्रकरणी सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट या शोचे आतापर्यंतचे सर्व 18 भाग काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी सायबर पोलिसांनी यूट्यूबला पत्र लिहिले आहे. या पत्रात पोलिसांनी यूट्यूबवरून इंडियाज गॉट लेटेंट शोचे सर्व 18 आक्षेपार्ह भाग त्वरित हटवण्यास आणि चॅनलवर कारवाई करण्यास सांगितले आहे. याशिवाय यूट्यूबला अशी प्रत्येक शोचे पाहणी करून अश्लीलता असलेल्या एपिसोड हटविण्यास सांगितले आहे.

याप्रकरणी अनिल कुमार पांडे यांनी सायबर पोलिसात 30 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. प्रथम सायबर पोलिसांनी सर्व प्रकरणांचा तपास केला, त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व लोक शोच्या जज पॅनलचा भाग आहेत. याशिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक रणवीर अलाहाबादियाच्या घरीही पोहोचले होते.याशिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांचे पथक रणवीर अलाहाबादियाच्या घरीही पोहोचले होते. याच प्रकरणात सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि यूट्यूबर अपूर्व माखिजा यांचीही चौकशी करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी त्याची 2 तास चौकशी केली.या शोमध्ये अपूर्व माखिजाने अतिशय अश्लील कमेंट्स केल्या होत्या आणि स्पर्धकांना शिवीगाळही केली होती अशी माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0