Mumbai Digital Arrest Scam : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; 72 वर्षीय महिलेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक टळली
मुंबई :- उच्च न्यायालय, दिल्ली पोलीस आणि सीबीआयचे अधिकारी असल्याचे भासवून एका 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेला ‘डिजिटल अरेस्ट’ करण्याची धमकी देत फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. Mumbai Police News या टोळीने महिलेकडून 1.26 कोटी रुपये उकळले होते. मात्र, गुन्हा दाखल होताच अवघ्या 36 तासांत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत त्यापैकी 1.23 कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात यश मिळवले आहे. Mumbai Latest Crime News
नेमका प्रकार काय?
पीडित महिला मुंबईतील रहिवासी आहेत. 18 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2025 या कालावधीत त्यांना व्हॉट्सॲप कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला ‘डी.सी.पी. संजय अरोरा’ असल्याचे भासवले. त्याने दिल्ली पोलीस, उच्च न्यायालय आणि सीबीआयमधील अधिकारी असल्याचे सांगून महिलेला सांगितले की त्या एका गंभीर गुन्ह्यात सहभागी आहेत. आरोपीने महिलेला बनावट अटक वॉरंट आणि इतर कागदपत्रे व्हॉट्सॲपवर पाठवली आणि जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे दिले नाहीत तर त्यांना अटक करून पोलीस कोठडीत पाठवण्याची धमकी दिली. या दबावामुळे घाबरलेल्या महिलेने 1 कोटी 26 लाख 500 रुपये आरोपींनी दिलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केले.
पोलिसांची तात्काळ कारवाई
फसवणुकीची बाब लक्षात येताच महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. तक्रार दाखल झाल्यानंतर पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने तात्काळ कारवाई सुरू केली. त्यांनी संबंधित बँकांशी संपर्क साधून आरोपींनी जमा केलेली रक्कम गोठवण्याची प्रक्रिया सुरू केली. या तात्काळ केलेल्या कारवाईमुळे 1 कोटी 26 लाख रुपयांपैकी तब्बल 1 कोटी 23 लाख रुपये गोठवण्यात पोलिसांना यश आले.
आरोपींना 36 तासांत अटक
या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी दोन लाभार्थी बँक खात्यांचा मागोवा घेतला. सातत्याने तपास करून पोलिसांनी दोन्ही आरोपींचा माग काढला आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर केवळ 36 तासांत त्यांना शिताफीने अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये रोहित संजय सोनार (वय 33, रा. जळगाव) आणि हितेश हिम्मत पाटील (वय 31, रा. जळगाव) यांचा समावेश आहे. रोहित सोनार हा लाभार्थी बँक खातेधारक आहे, तर हितेश पाटील याने हे बँक खाते थायलंडमधील सायबर गुन्हेगारांना पुरवले होते. या कारवाईमुळे आरोपींचे बँक खाते इतर अनेक गुन्ह्यांसाठी वापरले जाण्यापूर्वीच त्याला प्रतिबंध बसला आहे.
ही प्रभावी कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (गुन्हे) लखमी गौतम, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उप आयुक्त (सायबर) पुरुषोत्तम कराड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विश्वानाथ कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुवर्णा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी यशस्वी केली.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…