Cyber Crime Awareness : शालेय विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक सायबर पोलिसांकडून सायबर सेक्युरिटीबाबत धडे
Mira Bhaynadar Police Organized Cyber Crime Awareness : राम रतन इंटरनॅशनल स्कूल, उत्तन, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर विभागाकडून मार्गदर्शन, विद्यार्थी, शिक्षक आणि ज्येष्ठ नागरिक यांनी गिरविले सायबर सिक्युरिटी चे धडे
नालासोपारा :- स्मार्ट फोनमुळे सोशल मीडियाचा वाढता वापर आणि त्या माध्यमातून वाढती गुन्हेगारी सामाजिक चिंतेची बाब आहे. या सायबर गुन्हेगारीला अटकाव घालण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती व प्रबोधनात्मक उपाययोजना राबविल्या जातात. मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर गुन्हे शाखेकडून जनजागृती कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामध्ये पोलीस आयुक्त यांनी सायबर गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या संकल्पनेतून हा कार्यक्रम राम रतन इंटरनॅशनल स्कूल उत्तन येथे आयोजित करण्यात आला होता. Mira Bhaynadar Police Organized Cyber Crime Awareness
सायबर विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर यांनी सायबर गुन्हेगारीसंदर्भात विद्यार्थ्यासह शिक्षक, ज्येष्ठ नागरिकांना साक्षरतेचे धडे दिले आहे.स्मार्ट फोनमुळे ऑनलाइन बँकिंग, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉलिंग, चॅटिंगचा वापर समाजात मोठ्या प्रमाणात वाढला आहे.यातूनच सायबर गुन्हेगारी वाढली आहे. ऑनलाइन फसवणूक, मोबाईल हॉकिंग, डाटा चोरी, अश्लील चॅटिंग, व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करणे यासह टीमव्ह्यवर, ऐनी डेस्कसारखे ॲप डाऊनलोड करण्यास सांगून बँक खात्यासह मोबाईलचा ॲक्सेस मिळवत परस्पर रक्कम काढून घेत आर्थिक फसवणुकीचे प्रकार सातत्याने घडत आहे. यावर आळा घालण्याकरिता कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नये, बँके संदर्भातील व्यवहाराकरिता कोणताही ओटीपी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय देऊ नये असे मार्गदर्शन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिरामध्ये 100 विद्यार्थी , शिक्षक, ज्येष्ठ नागरिक यांनी सहभागी झाले होते. Mira Bhaynadar Police Organized Cyber Crime Awareness