Cyber Crime Awareness : मिरारोड मधील Divine Mercy church मध्ये सायबर गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रम

Mira Road Police Cyber Crime Awareness : सायबर पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचे मार्गदर्शन
मिरा रोड :- मिरा रोड येथील थीम Divine Mercy church मध्ये रविवारी (30 मार्च) रोजी सायबर फसवणूक, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Mira Road Police Cyber Crime Awareness
मीरा-भाईंदर वसई विरारच्या पोलीस आयुक्तालयाच्या सायबर सेल, सायबर फसवणूक आणि गुन्हेगारी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सायबर पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर त्यांनी उपस्थित असलेल्या 150-180 नागरिकांना मार्गदर्शन केले आहे.



1.सध्यस्थितीत घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes).
2.सोशल मिडीयासंदर्भात पडणारे गुन्हे (Social Media Related crimes/social media etiquette).
3.ऑनलाईन सायबर गुन्हयांस कश्याप्रकारे टाळता येईल याबाचतची माहिती (Precautions to be Taken).
4.ऑनलाईन गुन्हयास बळी पडल्यास तात्काळ कोठे व कश्याप्रकारे तक्रार नोंदविता येईल याचाबतची माहिती. (Where and How to Complaint ?).
या कार्यक्रमामध्ये 20 ते 65 वयोगटातील नागरीक उपस्थित होते. तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित नागरीकांना दैनंदिन जिवनात इंटरनेटच्या माध्यामातुन होणारे आर्थिक व्यवहार व सोशल मिडीया संदर्भात आपण कसे सुरक्षित राहावे याबाबत महत्त्वपुर्ण अश्या सुचना देण्यात आल्यात.