देश-विदेश
Trending

CM Sawant : नेक्स्ट-जेन जीएसटी सुधारणा ही प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक दिवाळी भेट – मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी | ४ सप्टेंबर २०२५
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत CM Sawant ON GST यांनी केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नेक्स्ट-जेन जीएसटी सुधारणांचे स्वागत करताना ही प्रत्येक भारतीयासाठी ऐतिहासिक दिवाळी भेट असल्याचे म्हटले. पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या सुधारणा “जीवन सुलभता आणि व्यवसाय सुलभतेकडे नेणारे ऐतिहासिक पाऊल” असे संबोधले. Goa Latest News

नवीन कर संरचनेनुसार, चार कर दराऐवजी केवळ दोन – ५% आणि १८% ठेवण्यात आले आहेत. यामुळे गरीब कुटुंबे, शेतकरी आणि लहान व्यवसाय यांना थेट फायदा होणार आहे. अन्नधान्ये व औषधे स्वस्त होणार असून आरोग्य सेवा, जीवन व आरोग्य विमा, तसेच ऑक्सिजन, थर्मामीटर आणि डायग्नोस्टिक किटसारखी वैद्यकीय उपकरणे कमी दरात किंवा सूट मिळणार आहेत.

शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, टायर आणि ड्रिप सिंचन उपकरणांवरील कर ५% करण्यात आला आहे. वाहन क्षेत्राला दिलासा देत हायब्रिड कार, मोटारसायकल आणि तीनचाकीवरील जीएसटी २८% वरून १८% करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रालाही प्रोत्साहन देण्यात आले असून नोटबुक आणि स्टेशनरीला सूट देण्यात आली आहे.

डॉ. सावंत म्हणाले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कर प्रणाली अधिक सोपी, पारदर्शक व सर्वसमावेशक झाली आहे. घरांपासून शेतकरी व उद्योगांपर्यंत प्रत्येक घटकाला या सुधारणांचा लाभ होईल.”

गोव्यातील जीएसटीची कामगिरी मांडताना त्यांनी सांगितले की, २०१७ मध्ये २२,१९७ करदाते असताना, जुलै २०२५ पर्यंत हा आकडा ४७,२३२ वर पोहोचला आहे. महसूल उभारणीमध्येही लक्षणीय वाढ झाली असून २०१८–१९ मधील ₹२,५२९ कोटींवरून २०२४–२५ मध्ये ₹४,४२४ कोटी, म्हणजेच ७४% वाढ झाली आहे.

शेवटी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि जीएसटी कौन्सिलमधील सदस्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “या सुधारणा केवळ छोट्या कुटुंबे, शेतकरी व व्यवसायिकांसाठी लाभदायी ठरणार नाहीत तर ‘विकसित भारत २०४७’ च्या दिशेनेही हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0