CSMT Bomb Threat : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस RDX उडवून देण्याची धमकी, आरोपी ताब्यात
CSMT Bomb Threat : जीआरपीने सांगितले की कॉलरचा फोन बंद आहे. यापूर्वी जागा शोधण्याचा प्रयत्न केला असता ते सीएसएमटीजवळ असल्याचे दिसून आले.
मुंबई :- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर RDX मिळाले असून, CSMT Bomb Threat स्टेशन उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मुंबईच्या जीआरपी नियंत्रण कक्षाला फोन करून धमकी दिली. यानंतर एकच गोंधळ उडाला. जीआरपी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी एका अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि त्यात सीएसएमटीमध्ये RDX साठवून ठेवल्याचा दावा करण्यात आला.फोन येताच जीआरपी पोलिसांनी स्थानिक पोलिसांना आणि बॉम्बशोधक पथकाला माहिती दिली. कॉल केल्यानंतर, पोलिसांनी कारवाई केली आणि सीएसएमटी स्थानकांवर शोध सुरू केला परंतु काहीही संशयास्पद आढळले नाही. Mumbai Breaking News
कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले की कॉलरचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे लोकेशन सीएसएमटीजवळ असल्याचे दिसून आले. जीआरपीने आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी सचिन शिंदे याने अशी धमकी का दिली आणि त्यामागचा हेतू काय, याची चौकशी करण्यात येत आहे. Mumbai Breaking News