ठाणेमुंबई
Trending

Crowfed Market Fire News : क्रॉफर्ड मार्केटमधील ‘बाटा’ शोरूमला भीषण आग; लाखोंचे बूट-चपला जळून खाक

Mumbai Latest Fire News : द्वारकादास इमारतीतील दुमजली शोरूममध्ये आग; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

मुंबई :- दक्षिण मुंबईतील खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरातील ‘बाटा’ (Bata) या दुमजली शोरूमला रविवारी रात्री सुमारे साडे दहा वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्रीपर्यंत अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आले असले तरी, या आगीत शोरूममधील लाखोंचे बूट आणि चपला जळून खाक झाले आहेत.

मध्यरात्रीपर्यंत शर्थीचे प्रयत्न

द्वारकादास या चार मजली इमारतीतील ‘बाटा’ शोरूममध्ये ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला आगीची तीव्रता कमी असल्याने ‘क्रमांक 1’ची वर्दी देण्यात आली होती, मात्र थोड्याच वेळात आगीचे लोळ वाढल्याने ‘क्रमांक २’ची वर्दी देण्यात आली.

आग विझवण्यासाठी घटनास्थळी 8 फायर इंजिन, 6 जंबो टँकर,1 रेस्क्यू व्हॅन तसेच इतर आवश्यक साहित्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रात्री साडे बारा वाजता ही आग पूर्णपणे विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, आग प्रामुख्याने बाटा शोरूममधील साहित्यापुरती मर्यादित होती. रात्रीची वेळ असल्याने शोरूम बंद होते आणि या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा कोणी जखमी झाल्याची नोंद नाही. मात्र, लागलेल्या आगीमुळे शेजारच्या दुकानांमधूनही धूर बाहेर येताना दिसला. या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0