Navi Mumbai Crime News : गुन्हे शाखेची छापेमारी ; हायवेवर अश्लील चाळे करणाऱ्या 21 किन्नरवर कारवाई
•Navi Mumbai Crime News उरण फाटा सर्व्हिस रोड, जुईनगर सर्व्हिस रोड, एपीएमसी ट्रक टर्मिनल येथे गुन्हे शाखेची मोठी कारवाई
नवी मुंबई :- हायवेवर पैसे मागण्याच्या बहाण्याने अश्लील चाळे करणाऱ्या किन्नर (तृतीय पंथ) 21 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अंधार पडल्यानंतर अतिशय तोकडे कपडे घालून अश्लील हावभाव, टाळ्या वाजून हातवारे करणाऱ्या 21 किन्नरवर गुन्हे शाखेने तीन ठिकाणी छापेमारी करुन अटक केली आहे.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना नवी मुंबई आयुक्त यांनी परिसरात तृतीय पंथ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांनी गुन्हे शाखेच्या तीन टीम तयार केल्या, उरण फाटा सर्व्हिस रोड, जुईनगर सर्व्हिस रोड, एपीएमसी ट्रक टर्मिनल येथे छापेमारी करून अनुक्रमे 03,12 आणि 06 तृतीय पंथ्याना ताब्यात घेतले आहे. सीबीडी, नेरूळ, एपीएमसी या पोलीस ठाण्यामध्ये बीएनएस कलम 296,3(5) गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.
पोलीस पथक
अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, नवी मुंबई तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त, धर्मपाल बनसोडे, AHTU, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद भरगुडे, पोलीस हवलदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, पोलीस शिपाई चव्हाण, महिला पोलीस नाईक म्हात्रे,अडकमोल, पोलीस शिपाई शिंदे सर्व नेमणुक अ.मा.वा. प्रति. कक्ष, गुन्हे शाखा नवी मुंबई तसेच गुन्हे शाखेच्या इतर कक्षाकडील हवालदार चौधरी, महिला पोलीस हवालदार गाडगीळ, महिला पोलीस शिपाई डमाळे, पोलीस शिपाई बांडे, कदम,कोळी हे सहभागी होते.