Crime Branch Busted Drug Racket In Bhayandar : गुन्हे शाखेकडून दोघांना अटक करून एक कोटी 25 लाखांचे तीन किलो 132 ग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा चरस जप्त
भाईंदर :- भाईंदर परिसरातील Bhayandar City गोल्डन नेस्ट येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई Anti Narcotics Squad करत कोट्यावधींचा उच्च दर्जाचा चरस अंमली पदार्थ जप्त केला आहे. Crime Branch Busted Drug Racket पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून ते मध्य प्रदेश मध्ये राहणारे आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून तीन किलो 132 ग्रॅम वजनाचे एक कोटी 25 लाख 28 हजार रुपयांचे उच्च दर्जाचे चरस अंमली पदार्थ पोलिसांनी जप्त केला आहे.
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या विशेष पथक सध्या रात्रंदिवस तैनात आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठी, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे आणि पोलीस पथक परिमंडळ-1 परिसरात गस्ती घालत असताना पोलिसांना गोल्डन नेस्ट भाईंदर पूर्व येथे दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत मिळून आल्याने पंचासमक्ष झडती घेतली असता पोलिसांना दोन्ही व्यक्तीच्या ताब्यातून तीन किलो 132 ग्रॅम वजनाचा एक कोटी 25 लाख 28 हजार रुपये किमतीचा उच्च प्रतीचा चरस अंमली पदार्थ आढळून आला आहे.दोन्ही व्यक्तीच्या विरुध्द एन.डी.पी.एस कायदा 1985 चे कलम 8 (क), 20(ब) ए (क),29 प्रमाणे नवघर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंमली विरोधी पथकामार्फत चालु आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-1 अतिरीक्त कार्यभार पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर मराठे, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, पोलीस उपनिरीक्षक उदय पाठक, पोलीस हवालदार इंगळे, टक्के, पाटील, कुडवे, पागधरे आव्हाड,यादव, महिला पोलीस हवालदार एक्कलदेवी, पोलीस अंमलदार डोखळे यांनी कारवाई केली आहे.