Mumbai Drugs News : गोरेगावमध्ये ‘एम.डी.’चा मेगा स्फोट – बांगुरनगर पोलिसांची धडाकेबाज कारवाई!

मुंबईत अंमली पदार्थांच्या जाळ्यावर बांगुरनगर पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज छापा टाकत मेफेड्रॉन (एम.डी.) विक्रेत्यांचे पाय उखडले.
कडक कारवाई
दिनांक २४ सप्टेंबर २०२५, दुपारी १२.४५ वा. 📍 तांब गल्ली, भगतसिंग नगर नं.२, लिंक रोड, गोरेगाव (पश्चिम)
गस्तीदरम्यान पोलीस उपनिरीक्षक पियुष टारे व पथकाला एक इसम संशयास्पद हालचाल करताना दिसला.
थांबवून विचारपूस केली असता इसम टाळाटाळ करू लागला. कायदेशीर झडतीत उघड झालेले चित्र धक्कादायकच – ₹५,२५,५०० किंमतीचा तब्बल ५२.५५ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) जप्त!
मोठा उलगडा – महिला पुरवठादार जाळ्यात
अटक आरोपीने चौकशीत कबुली दिली की हा घातक नशा माल त्याला अंजली अजय ठाकूर या महिलेकडून मिळाला.
त्यानंतर पोलिसांनी कुशाग्र सापळा रचत २५ सप्टेंबर रोजी अंजलीलाही जेरबंद केले.
अंजलीचा गुन्हेगारी इतिहास
अंजली ठाकूर हिच्यावर आधीपासूनच एन.डी.पी.एस. आणि मपोकासह अनेक गुन्हे दाखल असून ती पोलिसांच्या रडारवर होती.
अनेक पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची यादी तिच्या ‘ड्रग क्वीन’ प्रतिमेची साक्ष देत आहे.
यशस्वी मोहिम
ही धाडसी कामगिरी पोलीस आयुक्त देवेन भारती, अपर आयुक्त सत्यनारायण चौधरी, परिमंडळ–११ चे उपआयुक्त संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस आयुक्त हेमंत सावंत, वरिष्ठ निरीक्षक रविंद्र आव्हाड, पो.नि. अमित शितोळे
तसेच उपनिरीक्षक पियुष टारे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी राबविली.
बांगुरनगर पोलिसांच्या या थरारक ऑपरेशनमुळे मुंबईतील एम.डी.चे मोठे रॅकेट हादरले असून, पुढील तपासात आणखी भस्मासुर उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे!


