• क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून देण्यास सायबर पोलीसांना यश
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चंपालाल या व्यक्तीच्या क्रेडिट कार्ड चालू ठेवण्यासाठी अपडेट करावे लागेल असा कॉल आला होता. चंपालाल यांनी क्रेडिट कार्ड चालू ठेवण्यासाठी व्यक्तीला कोणतीही विचारपूस न करता संपूर्ण माहिती दिली आणि त्या माहिती आधारे समोरील व्यक्तीने त्यांच्या क्रेडिट कार्ड मधून 77 हजार 688 रुपये एवढी रक्कम काढून त्यांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे.
सायबर विभागाचे यशस्वी कारवाई
चंपालाल यांनी घडलेल्या घटनेबाबत काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी संबंधित तक्रार सायबर विभागाला दाखल केली आहे .सायबर विभागाने फसवणूक झालेले रक्कम शोधण्यासाठी प्रयत्न केले असता सदर रक्कम Amazon च्या मर्चंट अकाउंट मध्ये गेल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी तात्काळ पत्रव्यवहार करून सातत्यपूर्ण पुरावा करून फसवणुकीतील रक्कम थांबवण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून फसवणुकीचे रक्कम चंपालाल यांच्या खात्यावर परत मिळवून देण्यास यश आले आहे. चंपालाल यांची 77 हजार 688 रुपये ऑनलाइन फसवणुकीची रक्कम मीरा भाईंदर वसई विरारच्या आणि काशिमीरा पोलिसांच्या सायबर विभागाने परत मिळवून दिली आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे),मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, सुवर्णा माळी, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, पोलीस अंमलदार राहुल बन, कुणाल सावळे, राजेश भरकडे, आकाश बोरसे यांनी पार पाडली आहे. तसेच पोलिसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,बैंक/क्रेडीट कार्ड बैंक कोणत्याही प्रकारे ग्राहकांना एसएमएस किंवा फोनवर संपर्क साधून वैयक्तिक गोपनीय माहिती विचारणा करत नाही. तसेच त्या संदर्भात कोणतीही माहिती अज्ञात व्यक्तीला देऊ नये जेणेकरून तुमची आर्थिक फसवणूक होणार नाही हे जे दक्षता घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…