Credit Card Fraud : क्रेडिट लिमिट वाढवण्याच्या जाळ्यात 1.45 लाख गमावले; सायबर पोलिसांनी परत मिळवले

Mira Bhayandar Latest Credit Card Fraud News : मीरा-भाईंदर सायबर पोलिसांचा प्रभावी तपास; ऑनलाईन शॉपिंग व्यवहारातून फसवणूक
मिरा-भाईंदर :- क्रेडिट कार्डची लिमिट (मर्यादा) वाढवून देण्याच्या बहाण्याने Credit Card Fraud फसवणूक झालेल्या तक्रारदार अजिरा कोरीया यांचे 1 लाख 45 हजार रुपये परत मिळवण्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या Vasai Virar Cyber Cell सायबर पोलीस ठाण्यास मोठे यश आले आहे. Mira Bhayandar Latest Crime News
नेमका प्रकार काय घडला?
अर्नाळा पोलीस ठाण्याच्या Arnala Police Station हद्दीत राहणाऱ्या अजिरा कोरीया यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन केला. त्याने ‘क्रेडिट कार्ड विभागातून बोलत असल्याचे’ सांगून, कार्डची लिमिट वाढवायची असल्यास मोबाईलवर आलेल्या एका विशिष्ट लिंकवर क्लिक करण्यास सांगितले. तक्रारदार यांनी त्या लिंकवर क्लिक करताच, त्यांच्या क्रेडिट कार्ड खात्यातून रक्कम कपात झाल्याचा संदेश (मॅसेज) त्यांना मिळाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांची तात्काळ आणि प्रभावी कारवाई
सायबर पोलीस ठाण्यात तक्रार येताच, पोलिसांनी तात्काळ NCCRP पोर्टलवर (NCCRP Portal 31906250100542) गुन्हा नोंदवला. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासणीत, फसवणुकीची रक्कम ऑनलाईन शॉपिंगसाठी वापरण्यात आल्याचे दिसून आले.
प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तात्काळ संबंधित ऑनलाईन शॉपिंग कंपनीशी पत्रव्यवहार केला. त्यांनी सदर व्यवहार रद्द करून फसवणुकीची रक्कम तक्रारदारांच्या मूळ खात्यात परत मिळवण्याची मागणी केली.
चार महिन्यांचा यशस्वी पाठपुरावा
या प्रकरणात पोलिसांनी तब्बल चार महिने संबंधित कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि योग्य कायदेशीर प्रक्रियेमुळे, अखेर 9 ऑक्टोबर 2027 रोजी तक्रारदार कोरीया यांची फसवणूक झालेली संपूर्ण 1.45 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या मूळ खात्यात परत जमा झाली आहे.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई यशस्वी झाली आहे.



