लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; पाच हजाराची लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला केले अटक
Anti Corruption Bureau News Buldana: प्लॉट विकत घेताना प्लॉटची फेरफार ला नोंदणी करण्याकरिता ग्रामसेवकाने मागितले होते 8 हजारांची लाच, ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात
बुलढाणा :- प्रमोद प्रकाश मोरे (36 वर्ष), ग्रामसेवक (देवगाव खवने पंचायत समिती मंठा, तालुका लोणार जिल्हा बुलढाणा ) तक्रारदार याने प्लॉट विकत घेतला आहे. प्लॉटची फेरफार नोंद करून घेण्यासाठी तक्रारदार याच्याकडे ग्रामसेवकांनी 8000 रुपयाची लाच मागितली होती. “Uncovering the Mystery: The Plot Scam of a Corrupt Gram Sevak” तडजोडी अंती ही रक्कम 5000 वर निश्चित करण्यात आली होती. पाच हजाराची लाच स्वीकारताना प्रमोद मोरे या ग्रामसेवकाला एसीबीने रंगेहात अटक केली आहे. “Commanding Justice: The Arrest of a Corrupt Gram Sevak in Plot Scam”
लाचखोर ग्रामसेवकाला पाच हजाराची लाच स्वीकारताना अटक
तक्रारदार यांनी त्याच्या गावांमध्ये ग्रामपंचायत मालमत्ता क्रमांक 456/1 मधील प्लॉट विकत घेतला होता. या प्लॉटचे फेरफार ला नोंद घेण्यासाठी तक्रारदार यांनी ग्रामसेवकाला आठ मे 2024 रोजी कागदपत्र दिले होते. फेरफार करून घेण्यासाठी ग्रामसेवकाने तक्रारदाराच्या कडे आठ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर 26 जून रोजी तक्रारदाराचे फेर घेण्यासाठी तडजोडी अंती पाच हजार रुपयाची मागणी करून तक्रारदार येणे लाचेची रक्कम देताना पंचसमक्ष स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात अटक करण्यात आली आहे. “Current Affairs: Gramsevak Caught Red-Handed Accepting Bribe for Plot Transfer” पोलीस स्टेशन मंठा जिल्हा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबी पथक
पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजी नगर मुकुंद आघाव, पोलीस उपअधीक्षक, जालना किरण बिडवे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग जालना, यांच्यासह पोलिसा हवालदार गजानन घायवट, गजानन कांबळे, गणेश बुजाडे, भालचंद्र बिनोरकर, शिवलिंगे खुळे यांनी लाचखोर ग्रामसेवकाला सापळा रचून लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. “Questioning Integrity: The Curious Case of the Corrupt Gram Sevak”