Naxal Attack at Chhattisgarh : गस्तीवर असतानाच नक्षली हल्ला; छत्तीसगडमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक शहीद

ips officer akash rao giripunje killed in naxal attack at Chhattisgarh : कोंटा विभागात भूसुरुंग स्फोट; आकाश राव गिरीपुंजे यांचा मृत्यू, काही जवान जखमी
ANI :- छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात 9 जून रोजी सकाळी 11 वाजता नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून आणत एक मोठा हिंसक हल्ला केला. ips officer akash rao giripunje killed in naxal attack at Chhattisgarh या हल्ल्यात कोटा विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे (वय 46) शहीद झाले. त्यांच्या सोबत असलेल्या काही पोलीस अधिकाऱ्यांना व जवानांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गिरीपुंजे हे नक्षलविरोधी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोंटा-एर्राबोर मार्गावर पायदळ गस्तीवर होते. डोंड्रा गावाजवळ नक्षलवाद्यांनी पूर्वनियोजित स्फोटक सापळा लपवून ठेवला होता. गस्तीदरम्यान अचानक झालेल्या शक्तिशाली स्फोटात गिरीपुंजे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी “गस्तीदरम्यान ‘मी पुढे चाललोय, तुम्ही मागे नका राहू’ म्हणणारे साहेब खरोखरच आम्हाला मागे ठेवून निघून गेले,” अशा भावना व्यक्त केल्या.
21 मे रोजी या परिसरात झालेल्या चकमकीत नक्षल चळवळीचा मुख्य नेता बसवा राजू ठार झाला होता. त्याच्या स्मरणार्थ नक्षलवाद्यांनी 10 जून रोजी भारत बंदची हाक दिली होती. त्याआधीच, 9 जून रोजी हल्ला करून नक्षलवाद्यांनी सरकारविरोधातील आपली आक्रमकता दाखवली आहे.
सुरक्षा यंत्रणांनुसार, आता नक्षलवादी रस्त्याखाली 2 फूटांहून अधिक खोलीवर स्फोटके लपवत आहेत. त्यामुळे उच्च तंत्रज्ञान असतानाही अशा स्फोटकांचा शोध घेणे कठीण बनले आहे. यापूर्वी बिजापूरमध्येही अशीच पद्धत वापरून हल्ला करण्यात आला होता, त्यामुळे नक्षलवाद्यांच्या युद्धतंत्रात बदल झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.



