देश-विदेश

Congress MP Suspended : संसदेत ‘रणांगण’! कागद भिरकावल्याने काँग्रेसच्या 7 आणि माकपच्या 1खासदाराचे निलंबन

Congress MP Suspended : राहुल गांधींच्या भाषणावरून अभूतपूर्व गदारोळ; आज सायंकाळी 5 वाजता पंतप्रधान मोदी लोकसभेत उत्तर देणार

ANI | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सहावा दिवस राजकीय संघर्षाने गाजला आहे. भारत-चीन सीमावादावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे लोकसभेत निर्माण झालेला पेच अखेर खासदारांच्या निलंबनापर्यंत पोहोचला. पीठासन सभापतींच्या दिशेने कागद भिरकावल्याचा ठपका ठेवत काँग्रेसच्या 7 आणि माकपच्या एका खासदाराला संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, आज (बुधवारी) सायंकाळी ५ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर लोकसभेत उत्तर देण्याची शक्यता आहे.

वादाचे केंद्र: माजी लष्करप्रमुखांचे पुस्तक

लोकसभेत 2 फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या चर्चेत राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या अप्रकाशित पुस्तकाचा संदर्भ दिला. चिनी रणगाड्यांच्या घुसखोरीबाबत या पुस्तकात खळबळजनक दावे असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. त्यांनी हे संदर्भ सभागृहात मांडण्याचा प्रयत्न केला असता, सत्ताधारी बाकांवरील नेत्यांनी “अप्रकाशित आणि असत्यापित” माहिती सभागृहात मांडता येणार नाही, असे म्हणत कडाडून विरोध केला.

पीठासन अधिकारी आणि निलंबनाची कारवाई

मंगळवारी जेव्हा राहुल गांधी बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा पीठासन अधिकारी कृष्णा प्रसाद तेन्नेटी यांनी त्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. मात्र, गोंधळ वाढत गेला आणि विरोधी पक्षाच्या खासदारांनी वेलमध्ये धाव घेत घोषणाबाजी सुरू केली. याच दरम्यान काही खासदारांनी सभापतींच्या आसनाच्या दिशेने कागद फाडून भिरकावले. या असंसदीय वर्तनानंतर पीठासन अधिकारी दिलीप सैकिया यांनी कारवाई करत खालील 8 खासदारांना निलंबित केले

गुरदीप सिंह औजला (काँग्रेस)

मणिकम टागोर (काँग्रेस)

अमरिंदर सिंह राजा वारिंग (काँग्रेस)

किरण कुमार रेड्डी (काँग्रेस)

हिबी ईडन (काँग्रेस)

डीन कुरियाकोस (काँग्रेस)

प्रशांत पडोले (काँग्रेस)

एस. वेंकटेशन (माकपा)

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago