Vijay Wadettiwar : मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची टीका
Vijay Wadettiwar React On Sudhir Mungantiwar : काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर टीका
मुंबई :- भाजपच्या लोकसभेच्या 20 उमेदवारांची यादी काल जाहीर झाली. या यादीत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, आपण लोकसभा लढवण्यास इच्छुक नसून आपल्याला राज्यातच राहायचे असल्याचे मुनगंटीवार यांनी म्हटले होते. “माझे तिकीट मीच कापेल, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी वल्गना केली होती”. मात्र, आता त्यांची दिल्लीत जाणारी वाट जनता कापेल, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला आहे. बिचाऱ्यांना इच्छा नसताना जबरदस्तीने त्यांच्या गळ्यात ही वरमाला घातली असल्याचे चित्र त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असल्याचेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. मात्र, तरी देखील त्यांचे नाव घोषीत झाल्यामुळे वडेट्टीवार यांनी त्यांच्यावर वार केला आहे. Vijay Wadettiwar React On Sudhir Mungantiwar
नव्या संसद भवनाला चंद्रपूर मधून पाठवलेल्या लाकडाचा दरवाजा आहे. या दरवाज्यातून चंद्रपूरची जनता मला नव्या संसद भवन मध्ये पाठवेल, अशा शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी उमेदवारीवर प्रतिक्रिया दिली होती. यावरून देखील वडेट्टीवावर यांनी वार केला आहे. ते लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. ते भाजपच्या प्रांगणातले नाही. त्यामुळे त्या दरवाजातून कोणी आत जायचे, याचा निर्णय चंद्रपूरची जनता घेणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. Vijay Wadettiwar React On Sudhir Mungantiwar
चंद्रपूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्ह्यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे येथून काँग्रेसचा उमेदवार लोकसभेवर निवडून येईल, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू Vijay Wadettiwar React On Sudhir Mungantiwar
विजय वडेट्टीवार यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांनी पक्षश्रेष्ठींकडे लोकसभा निवडणुकीचे तिकीट मागितले आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. त्यांनी तिकीट मागितले असले तरी पक्षश्रेष्ठी जो उमेदवार देतील त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू, असे म्हणत विजय वडेट्टीवार यांनी शिवानी यांच्या तिकिटावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसच्या उमेदवारी बाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे त्यामुळे कोणीही तिकीट मागत असेल तर त्याला विरोध करण्याचे काही कारण नाही किंवा तसे होऊ नये अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमची उमेदवारांची यादी लवकर जाहीर होईल असे संकेत देखील त्यांनी दिले.