Congress Member Nirmala Mhatre : पनवेल मधील होल्डिंग तसेच इमारतीवरील शेड व मोबाईल टॉवर संदर्भात पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा निर्मला म्हात्रे यांनी पनवेल महानगरपालिकेला दिले निवेदन
पनवेल (जितीन शेट्टी) : दिनांक १३ मे रोजी मुंबईमध्ये
वादळी पावसामुळे जे काही वित्तीय आणि मनुष्यहानी झाली आहे वेगवेगळ्या ठिकाणी पडलेले होल्डिंग (Panvel Hoardings )असतील किंवा इमारती मटेरियल (Old Buildings) असेल त्यामुळे सामान्य नागरिकांना आपले प्राण आणि वित्तीय नुकसान भोगावे लागलेले आहे याच अनुषंगाने पनवेल महापालिकेला महिला काँग्रेसच्या Congress Member Nirmala Mhatre माध्यमातून निवेदन देण्यात आले.
पनवेल महापालिका (Panvel BMC) ही राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या तसेच भविष्यातील विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी महापालिका आहे पनवेल तसेच पनवेल मध्ये आजूबाजूच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक खरेदीसाठी येतात कारण फार मोठ्या प्रमाणात व्यापारी बाजारपेठ पनवेल मध्ये आहे त्याच अनुषंगाने आपल्या उद्योगाचा किंवा आपल्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात जाहिरातीद्वारे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम म्हणून मोठी मोठी होर्डिंग लावली जातात तसेच पनवेल मध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरणाच्या माध्यमातून इमारती निर्माण करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने प्रत्येक व्यक्ती आपल्या इमारतीच्या संदर्भात माहिती फलक हे ही मोठ्या प्रमाणात सर्वत्र लावतात तसेच महापालिकेच्या क्षेत्रात मोठे मोठे होल्डिंग हे जाहिराती फलक लावण्यासाठी भाडेतत्त्वावरती देण्यात येतात याच अनुषंगाने भविष्यात कोणत्याही प्रकारे नागरिकांचे नुकसान अथवा इजा होऊ नये म्हणून महापालिका प्रशासनाने संबंधित जाहिराती फलकांसाठी नियम तयार करून तसेच जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला होल्डिंगच्या देखभाल संदर्भात सक्त ताकीद किंवा सूचना देण्यात यावी असे निवेदन पत्र पनवेल महापालिका उपायुक्त मारुती गायकवाड अतिक्रमण विभाग यांना पनवेल महिला कॉंग्रेस तर्फे देण्यात आले. Congress Member Nirmala Mhatre Requested Panvel BMC To Take Action On Illegal Hoarding Boards