पुणे

महाराष्ट्रात थंडीचे थैमान! – परभणीत 5.5°C आणि निफाडमध्ये 6.1°C नीचांकी तापमान, राज्यात ‘कोल्ड वेव्ह’चा तीव्र प्रकोप

Pune Weather News : पुण्यात यंदाच्या हंगामातील सर्वात कमी 8.1°C तापमान नोंदवले; विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला; पुढील 24 तास तापमानात आणखी घसरण होणार.

पुणे :- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी घट होत असून, राज्याचा बहुतांश भाग सध्या तीव्र थंडीच्या विळख्यात आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) नोंदवलेल्या माहितीनुसार, विदर्भ आणि मराठवाड्यात पारा 6 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला असून, उत्तर भारतातील ‘कोल्ड वेव्ह’चा तीव्र प्रभाव राज्यात स्पष्टपणे जाणवत आहे. Maharashtra Weather News

विक्रमी थंडीची नोंद

राज्यात या मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद मराठवाड्यातील परभणी येथे 5.5°C इतकी झाली आहे, ज्यामुळे या भागांत थंडीचा कडकडाट अधिक तीव्र झाला आहे. नाशिकमधील निफाड येथे तापमान थेट 6.1°C पर्यंत खाली आले असून, नाशिक जिल्ह्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये विदर्भातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात कमी तापमान 8.1°C आज नोंदवले गेले. विधिमंडळ अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या लोकांना सकाळच्या वेळी प्रचंड थंडीचा सामना करावा लागत आहे.

पुण्यातील सर्वात नीचांकी तापमान

पुणे शहरातही यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान नोंदवले गेले असून, किमान तापमान 8.1°C पर्यंत खाली आले आहे. शिवाजीनगरमध्ये 8.9°C, तर पाषाणमध्ये 8.4°C तापमानाची नोंद झाली आहे. हवामान खात्याने पुणे शहरात थंडीची लाट येण्याचा इशारा दिला असून, पुढील 24 तास तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

इतर भागांतील स्थिती

कोकणातील ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दापोलीतही तापमानाचा पारा 7°C वर आला आहे. मराठवाड्यातील परभणी (5.5°C) वगळता गोंदियात 8.4°, भंडाऱ्यात 12° आणि बुलढाण्यात 12.2° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागानुसार, मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंशांची आणखी घट होईल. या हवामानातील बदलांवर शेतकरी आणि द्राक्ष उत्पादकांनी लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

19 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago