क्राईम न्यूजमुंबई

CM Eknath Shinde : मुंबईत तरुणाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याचा पाठलाग ; पोलिसांची वाद

CM Eknath Shinde News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात घुसून त्यांचा पाठलाग करणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या ताफ्याचा पाठलाग करण्याप्रकरणी मुंबईतील एका तरुण आला पोलिसांनी Mumbai Police अटक केली आहे. तरुणाने पोलिसांची वाद घालत ताफ्यामध्ये जबरदस्ती घुसून पाठलाग करण्यात आल्याचा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शुभम कुमार असे अटक करण्यात आलेल्या तरुणांचे नाव असून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हाही दाखल केला आहे या तरुणांनी आपली ओळख अभिनेता असल्याचे सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून मुंबई कडून ठाण्याच्या दिशेने येत होता. बांद्रावरली सिलिंग रोड वरून पोलीस वाहतुकीचे नियम करत होते मुख्यमंत्र्याच्या ताब्यासाठी लेन सात आणि आठ रिकामी करण्यात आली होती मुख्यमंत्र्याचा ताफा जात असताना तरुणाला सहाव्या मधून जाण्यास पोलिसांनी सांगितले मात्र सत्याने सातव्या लाईन मध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात गाडी घेतली त्यानंतरही तरुण मुख्यमंत्र्याच्या टाक्यामागे गाडी चालवत होता वरली सेलिंग येथे थांबवण्यास इशारा करूनही करून थांबला नाही त्यानंतर वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवले आणि चौकशीत त्याने अभिनेता असल्याचे सांगितले या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमके झाले काय?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा रात्री 11:15 च्या सुमारास वरळीच्या दिशेने जात होता. त्यावेळी एक कारचालक त्याची गाडी भरधाव चालवत लेन क्रमांक 7 मध्ये आला. याच मार्गिकेवरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा जात होता. पोलिसांनी कार चालकाला त्वरीत लेन 6 मध्ये जाण्याचा इशारा केला. पण हा तरुण ऐकायला तयार नव्हता. त्याने कार बाजूला न घेता. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. हा तरुण कार तशीच सूसाट दामटत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसण्याचा आणि पाठलाग करण्याचा प्रयत्न करत होता. कार ताफ्याच्या मागोमाग घुसवत तोदेखील वरळीच्या दिशेने जाऊ लागला. पोलिसांनी वाहतूक शाखेच्या मदतीने त्याला थांबविले. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. या तरुणाने हा प्रकार का केला हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. इशारा देऊन हा तरुण न थांबल्याने पोलिसांनी सखोल तपास सुरु केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0