मुंबई

CM Eknath Shinde : वर्षा बंगल्यावर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांचे स्वागत, अभिनंदन

Shivsena Shinde Group MP Meeting In Mumbai : शिवसेना शिंदे गटाच्या नवनिर्वाचित खासदारांचे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई :- शिवसेना शिंदे गटाकडून Shinde Group लोकसभेच्या निवडणुकीमध्ये Lok Sabha Election विजय झालेला सर्व नवनिर्वाचित खासदारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्याकडून स्वागत केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित खासदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या सर्व नवनियुक्त खासदारांसाठी आज वर्षा निवासस्थानी विशेष स्नेहभोजन आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. Shivsena Group CM Eknath Shinde MP At Varsha Bungalow

यावेळी शिवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व सात खासदारांचे निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले, तसेच त्यांच्याशी संवाद साधला. निवडणुकीत नक्की कुठे कमी पडलो याचाही आढावा घेतला.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व खासदारांना सन्मानित केले तर स्नुषा सौ.वृषाली शिंदे यांनी या सर्व खासदारांचे औक्षण केले. Shivsena Group CM Eknath Shinde MP At Varsha Bungalow

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, खासदार प्रतापराव जाधव, खासदार संदीपान भुमरे, खासदार धैर्यशील माने, खासदार रवींद्र वायकर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार संजय मंडलिक, राहुल शेवाळे, कृपाल तुमाने, आमदार संजय शिरसाट, शिवसेना नेते आनंदराव अडसूळ, सचिव संजय मोरे उपस्थित होते.

Web Title : CM Eknath Shinde: Welcome and congratulations to MPs of Shiv Sena Shinde Group at Varsha Bungalow

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0