CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते परिवहन विभागाच्या 187 वाहनाला हिरवा झेंडा
CM Eknath Shinde Show Green flag to RTO Car : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ही वाहने परिवहन विभागाच्या ताब्यात दाखल करण्यात आली आहे.
मुंबई :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या हस्ते आरटीओ विभागात आता नवीन 187 वाहनांचा ताफा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी या वाहनांना हिरवा झेंडा दाखविला आहे. या वाहनांचे वैशिष्ट्य म्हणजे या वाहनांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा बसवून एखाद्या ठिकाणी ट्रॅफिक जाम असेल किंवा अपघाती मृत्यू झाला असेल मदत होण्यास उपयोगी पडणार आहे.यावेळी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, सह परिवहन आयुक्त भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील आदींसह परिवहन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले
परिवहन विभागाच्या 187 इंटरसेप्टर वाहनांना हिरवा झेंडा दाखवून ही वाहने परिवहन विभागाच्या ताफ्यात दाखल करण्यात आली. परिवहन विभागाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या या इंटरसेप्टर वाहनांमुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल. महामार्गावरील ब्लॅक स्पॉट दूर करून भविष्यात अपघाती मृत्यू कमी होण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल. अपघातमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून त्यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.