मुंबई

CM Eknath Shinde : जयंतराव आले, जयंतराव.. चादरवाले आले चादर वाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोचक टिप्पणी

Jayant Patil vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा

मुंबई :- विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन Maharashtra Monsoon Session चालू आहे. शुक्रवारी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार Ajit Pawar यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. अर्थसंकल्पाने वर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आले आहे. या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंनी आपल्या भूमिका मांडल्या जात होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी अर्थसंकल्पवर आपले भाषण करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील सभागृहाच्या आत आल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी जयंत पाटील Jayant Patil यांच्यावर खोचक टिपणी करत जयंतराव आले..जयंतराव चादरी वाले जयंतराव आले अशी टिपणी केली आहे. मुख्यमंत्री यांनी ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने’ची घोषणा केली आहे. Jayant Patil vs Eknath Shinde

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अर्थसंकल्पातील घोषणांवर टीका करताना “चादर लगी फटने, खैरात लगी बटने” असा टोला लगावला होता. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी तोंडसुख घेतलं. “जयंत पाटील म्हणाले की लोकसभा में चादर फट गई. अरे कुणाची चादर फाटली? मोदी तर पंतप्रधान झाले. फाटली कुणाची? हरलेले लोक पेढे वाटायला लागले येड्यासारखे. तुम्ही कशाला पेढे वाटताय? विरोधी पक्षनेतेपद मिळालं म्हणून? विजयराव, तुम्ही त्यांना सांगा तरी. जंग जंग पछाडल्यानंतरही तुम्ही मोदींना हटवू शकले नाहीत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. Jayant Patil vs Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रताप सरनाईकक यांच्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना तीर्थ दर्शन योजनेची घोषणा केली. यावेळी त्यांनी आधी भाषण केलेल्या प्रकाश सुर्वे आणि राम कदम यांचं कौतुक करताना “या दोघांचं प्रवचन तर अधिवेशन काळात ठेवलं तर बरं होईल. त्यांना बरीचशी माहिती आहे त्यात”, अशी मिश्किल टिप्पणीही केली. Jayant Patil vs Eknath Shinde

विजय वडेट्टीवारांची उक्ती, त्यावर मुख्यमंत्र्यांची युक्ती!

विजय वडेट्टीवारांनी एक म्हण ऐकवत राम कदम, प्रताप सरनाईक यांना टोला लगावण्याचा प्रयत्न केला. “आधी खोदले खोडखाड, नंतर बसले तुळशीफळ”, असं म्हटलं. “त्यांना लागू होतंय म्हणून बोललो, अर्थ सांगू का?” असा प्रश्नही त्यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रत्यु्त्तर देताना “नाही, अर्थ नका सांगू. नंतर तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. अर्थ सांगू नका”, असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0