Uncategorized

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरची पाहणी, आषाढी वारी निमित्त प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधाचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

CM Eknath Shinde Visit Pandharpur : आषाढी वारी सोहळ्यामध्ये कोणत्याही वारकऱ्याला भाविकाला सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात हा शासनाच्या हेतू असून त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.

पंढरपूर :- रविवारी (14 जुलै) आषाढीवारी निमित्त प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादाजी भुसे उपस्थित होते.

आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वारकरी भाविकाला आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, यासाठी प्रशासनाने नियोजनबद्ध व शिस्तबद्ध तयारी करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

यावेळी आषाढी यात्रेच्या मुख्य सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ पेयजल, आरोग्य, शौचालये, महिला भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सुविधा तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नान केल्यानंतर महिलांना कपडे बदलण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चेंजिंग रूमची पाहणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

प्रशासनाने उपलब्ध केलेल्या सोयी सुविधा बद्दल समाधान व्यक्त करुन स्वच्छतेसाठी अधिकचे मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. तसेच पत्रा शेड येथील दर्शन रांगेत वारकरी तसेच वारकरी भाविकांसाठी उभारलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.

शिष्य संत निळोबारायांच्या पादुकांचे दर्शन घेऊन पालखीत चालण्याचे भाग्य मिळाले.यावेळी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय… चा जयघोष करत, हाती भागवत धर्माचे प्रतीक असलेली भगवी पताका धरत, टाळ मृदुंगाच्या साथीने वारीत चालण्याचे सौभाग्य लाभले. मनातील सगळा बडेजाव दूर होत अलौकिक आनंदाची पर्वणी लाभल्याचे समाधान याप्रसंगी मिळाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 65 एकर येथून आमदार समाधान आवताडे यांच्या समवेत बुलेटवर बसून चंद्रभागा वाळवंट व पत्राशेड येथील दर्शन रांगेची पाहणी केली. दर्शन रांगेतील भाविकांशी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती जाणून घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0