मुंबई

Mumbai Cyber Fraud : सायबर गुन्ह्याचा विफल कट! 1930 हेल्पलाईनच्या सतर्कतेमुळे 1.29 कोटींचा आर्थिक अपघात टळला

  • 73 वर्षीय डॉक्टरची 2.89 कोटींची फसवणूक; मुंबई सायबर पथकाची तातडीची कारवाई

मुंबई | शहरातील एका ज्येष्ठ डॉक्टरला व्हिडीओ कॉलवरून TRAI अधिकारी, पोलीस आणि न्यायाधीश असल्याचे भासवून तब्बल 2.89 कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली. परंतु 1930 सायबर हेल्पलाईनवरील तातडीच्या कारवाईमुळे या रकमेतील 1.29 कोटी रुपये वाचवण्यात मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाला मोठे यश मिळाले आहे.

विलेपार्ले येथे राहणाऱ्या 73 वर्षीय डॉक्टरला अज्ञात इसमांनी व्हिडीओ कॉलवरून संपर्क साधत, त्यांच्या बँक खात्यावर ‘अनियमित व्यवहार’ झाल्याचा बनाव उभा केला. नरेश गोयल प्रकरणात त्यांचे नाव असल्याचा खोटा आरोप करत त्यांना डिजिटल अरेस्ट करण्याची धमकी देण्यात आली. दहशतीच्या वातावरणात त्यांच्याकडून 2.89 कोटी रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्सफर करून घेतले.

दरम्यान, तक्रार मिळताच 1930 हेल्पलाईनवरील पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर व त्यांच्या पथकाने NCRP पोर्टलवर तक्रार दाखल केली आणि संबंधित बँकांच्या नोडल अधिकाऱ्यांशी समन्वय साधत सुमारे 1.29 कोटी रुपयांवर त्वरित होल्ड आणण्यात यश मिळवले.

ही कारवाई सायबर गुन्हेगारीविरोधातील लढ्यात 1930 हेल्पलाईनची कार्यक्षमतेचे जिवंत उदाहरण ठरत आहे. नागरिकांनी अशा फसवणूक प्रकरणांमध्ये तत्काळ हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई देवेन भारती, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, लखमी गौतम, पोलीस सह आयुक्त, गुन्हे, शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुरुषोत्तम कराड, पोलीस उप आयुक्त, सायबर गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली सुवर्णा शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पश्चिम प्राभारी सायबर पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती बावस्कर यांच्या 1930 हेल्पलाईन पथकाने पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0