•मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगर मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. सीएम शिंदे यांनी आमदार संदिपान भुमरे यांना तिकीट दिले आहे
छत्रपती संभाजीनगर :-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी आमदार संदिपान भुमरे यांना तिकीट दिले आहे.
छत्रपती संभाजी नगरमधून उमेदवार कोण असणार याबाबत महायुतीमध्ये अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता सीएम एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. आता त्यांनी आपला उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला आहे.
इम्तियाज जलील 2024 च्या निवडणुकीत छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे उमेदवार आहेत. ते या मतदारसंघाचे विद्यमान खासदारही आहेत. यंदाच्या निवडणूक मध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असं सामना छत्रपती संभाजी नगर मध्ये पाहायला मिळणं नसून ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली असून शिवसेना शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. विद्यमान खासदार इम्तियाज जलील हे असून यंदाच्या निवडणुकीमध्ये तिहेरी सामना पाहायला मिळणार आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…