CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर डोळ्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया,पहिल्या उजव्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी डाव्या डोळ्यावर आठ मिनिटांत शस्त्रक्रिया झाली.
ठाणे :- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांच्या डोळ्यावर पुन्हा एकदा शस्त्रक्रिया Eye Operation करण्यात आली या शस्त्रक्रियेनंतर एकनाथ शिंदे यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता.ठाण्यातील डोळ्यांचे डॉ. चंद्रशेखर वावीकर यांच्या रुग्णालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दुसऱ्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. पहिल्या उजव्या डोळ्यावरील शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी डाव्या डोळ्यावर आठ मिनिटांत शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर तासाभरात त्यांना घरी सोडण्यात आले.
बुधवार, 25 सप्टेंबर रोजी डाव्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेच्या वेळी अमेरिकन कंपनीच्या लेन्सचा वापर केल्याने शिंदे यांच्या चष्म्याचा नंबर कमी होणार असल्याचे डॉ. वावीवर यांनी सांगितले. डॉ. वावीकर यांच्यासह डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 20 जणांचे पथक ऑपरेशन कक्षात होते.
मुख्यमंत्र्यांना डॉक्टरांनी तीन दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने मुख्यमंत्र्यांनी शिर्डी येथील लाडकी बहीण योजनेचा प्रचार, प्रसार कार्यक्रम, राहुरीतील कांदा महाबँकेचे भूमिपूजन आदी नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…