CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री आमदार शहाजी बापू पाटील यांची घेतली भेट
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात जाऊन आमदार शहाजी बापू पाटील यांची घेतली भेट
मुंबई :- शिवसेना फुटी नंतर शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झालेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात Bridge Candy Hospital जाऊन भेट घेतली. काय झाडी.. काय डोंगर.. सर्व काय ओके… या डायलॉग वर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हवा करणारे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji Bapu हे गेल्या काही दिवसांपासून गुडघ्यांच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील तीन दिवसांपासून त्यांच्या गावी महाबळेश्वर मधील दरे या गावी विश्रांती करिता गेले होते त्यावेळी ही त्यांनी शहाजी बापू पाटील MLA Shahaji Bapu यांना कॉल केला होता. Maharashtra Latest Political News
मुख्यमंत्र्यांनी घेतली शहाजी बापूंची भेट
सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji Bapu यांची ब्रीच कॅण्डी रुग्णालयात जाऊन बापूंच्या तब्येतीची आस्थेने चौकशी केली. तसेच डॉक्टरांकडून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेतली. त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरात लवकर त्यांनी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा एकदा जनसेवेसाठी कार्यरत व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शहाजीबापू पाटील यांचे कुटूंबीय आणि सहकारी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे उपस्थित होते. Maharashtra Latest Political News
Web Title : CM Eknath Shinde: Chief Minister Eknath Shinde met MLA Shahaji Bapu Patil at midnight